mandira bedi, raj kaushal FILE IMAGE
मनोरंजन

पतीच्या निधनानंतर मंदिरा बेदिने उचललं 'हे' पाऊल

पतीच्या निधनानंतर मंदिरा आणि तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

प्रियांका कुलकर्णी

प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीचा (mandira bedi) पती आणि दिग्दर्शक राज कौशल (raj kaushals) यांचे कार्डिअॅक अरेस्टने 30 जून रोजी निधन झाले. ते ४९ वर्षांचे होते. पतीच्या निधनानंतर मंदिरा आणि तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी राज यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली होती. यावेळी रोनित रॉय, आशिष चौधरी यांनी मंदिराचं सांत्वन केलं. वर्षानुवर्षांपासून चालू असलेल्या प्रथेला छेद देत मंदिराने तिच्या पतीचं पार्थिव उचललं होतं. सर्वसाधारणपणे हे कार्य पुरुषच करतात. त्यामुळे या गोष्टीचीही चर्चा झाली होती. राजच्या निधनानंतर मंदिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा प्रोफाइल फोटो काढून टाकला आहे. मंदिराच्या प्रोफाइलवर आता फक्त काळा रंग पाहायला मिळतो. ट्विटरवर मात्र मंदिराने काहीही बदल केलेला नाही. (mandira bedi took this step after her husband raj kaushal death)

राज यांच्या प्रार्थना सभेत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले. या प्रार्थना सभेनंतर राजचा फोटो शेअर करताना मंदिराची मैत्रीण मौनी रॉयनं एक भावूक पोस्ट शेअर केली. आम्ही सगळे तुला खूप मिस करतोय आणि आता काहीही आधीसारखं राहणार नाही, असं मौनीनं लिहिले आहे.

मंदिरा बेदी आणि राज कौशलने १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना तारा ही मुलगी आणि वीर हा मुलगा आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात मंदिरा आणि राजने चार वर्षीय ताराला दत्तक घेतलं. राजने 'अँथनी कौन है' (२००६), 'शादी का लड्डू' (२००४), 'प्यार मे कभी कभी' (१९९९) या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. २०२० मध्ये 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत मंदिराने पतीविषयी म्हटलं होतं, 'राजने मला नेहमीच प्रोत्साहित केले आहे. तो माझी ताकद आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT