mandira bedi 
मनोरंजन

'ही तर मूर्खपणाची हद्दच'; मंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्यांवर भडकली गायिका

प्रथेला छेद देत मंदिराने उचललं होतं पतीचं पार्थिव

स्वाती वेमूल

अभिनेत्री मंदिरा बेदीचा Mandira Bedi पती राज कौशल Raj Kaushal यांचे बुधवारी पहाटे कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले. यावेळी अनेक वर्षांपासून चालू असलेल्या प्रथेला छेद देत मंदिराने राज यांचं पार्थिव उचललं होतं. साधारणपणे हे सर्व कार्य पुरुषच करतात. त्यामुळे सोशल मीडियावर या गोष्टीची खूप चर्चा झाली. यात काहींनी मंदिराला ट्रोलसुद्धा केलं. या ट्रोलर्सना गायिका सोना मोहपात्राने Sona Mohapatra सडेतोड उत्तर दिलं आहे. 'लोकांच्या टीकेचं आश्चर्य वाटता कामा नये. कारण इथे मूर्खपणाची कमतरता नाही', असं तिने ट्विट केलं. (Mandira Bedi trolled for performing Raj Kaushals last rites Sona Mohapatra comments)

सोना मोहपात्राचं ट्विट-

'मंदिरा बेदीच्या ड्रेस कोडबाबत आणि पती राज कौशल यांचे अंत्यसंस्कार तिने करण्याबाबत काही लोक टीका करत आहेत. पण या गोष्टीचं आश्चर्य वाटता कामा नये. कारण आपल्या जगात इतर कोणत्याही घटकांपेक्षा मूर्खपणाच अधिक प्रमाणात आहे,' असं ट्विट करत सोनाने ट्रोलर्सना उत्तर दिलं.

दिग्दर्शक राज कौशल यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली. ते ४९ वर्षांचे होते. या कठीण काळात मंदिराचं सांत्वन करण्यासाठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार पोहोचले होते. राज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रोनित रॉय, आशिष चौधरी यांच्यासह इतरही टीव्ही आणि बॉलिवूड सेलिब्रिटी आले होते.

राज आणि मंदिराने १९९९ साली लग्न केलं होतं. या दोघांना तारा ही मुलगी आणि वीर हा मुलगा आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात मंदिरा आणि राजने चार वर्षीय ताराला दत्तक घेतलं. मुलीला दत्तक घेतल्यानंतर मंदिरा आणि राज खूप खूश होते. त्यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT