Mani Ratnam News esakal
मनोरंजन

Mani Ratnam: प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांना कोरोना, रुग्णालयात दाखल

दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांच्याविषयीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Mani Ratnam: दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांच्याविषयीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे त्यांना कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले (Bollywood News) आहे. सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, त्यांना चैन्नईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र अद्याप त्यांच्या प्रकृतीविषयी (Bollywood movies) कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. मणिरत्नम यांच्या कुटूंबियांच्यावतीनं देखील प्रकृतीची माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून मणिरत्नम हे त्यांच्या पोन्नियन सेलवनमुळे चर्चेत आले आहे.

मणिरत्नम यांच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ते तमिळ (Entertainment News) साहित्यातील प्रसिद्ध कलाकृती पोन्नियन सेल्वनवर चित्रपट निर्मिती करत आहेत. हा कलाकृतीवर चित्रपट निर्मिती करणे हे त्यांचे (Ponniyan Selvan 1) स्वप्न होते. त्याच्या पुर्ततेसाठी त्यांनी संघर्ष केला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री ऐश्वर्या रॉयचा फर्स्ट लूक व्हायरल झाला होता. त्याचा टीझरही प्रेक्षकांसमोर आला असून नेटकऱ्यांनी त्याचे स्वागत केले आहे. आता पीएस 1 ची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 30 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पीएस 1 च्या माध्यमातून ऐश्वर्या रॉय. चियान विक्रम, तृषा, कार्थी आणि जयम रवि मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सरथकुमार, प्रकाश राज, किशोर, पार्थिबन, शोभिता धूलिपाला आणि ऐश्वर्या या चित्रपटातून कमबॅक करणार आहे. चौळ वंशीय राजवटीवर आधारित हा चित्रपट आहे. त्याला ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांचे संगीत असणार आहे.

काही दिवसांपूर्वी मणिरत्नम यांचा पीएस 1 हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे दिसून आले होते. दीड हजार वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या चौळ वंशीय राजवटीवर चुकीच्या पद्धतीनं मांडणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी खरं खोटं करण्यासाठी वकिलांकडून खास स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT