मनोरंजन

'ती बोगस अभिनेत्री', विधू विनोद चोप्रा कुणाबद्दल बोलले?

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये bollywood जेवढा झगमगाट आहे त्यापेक्षा एकमेकांबदद्ल द्वेष असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यात मोठमोठ्या सेलिब्रेटींचा celebrities समावेश आहे. कुणाबद्दल चांगलं बोलणं, त्याच्या अभिनयाचे कौतूक भरभरुन कौतूक करणं हे फार कमी सेलिब्रेटी करताना दिसतात. अजूनही स्टार सेलिब्रेटी आपल्यापेक्षा ज्युनिअर अभिनेत्याचे मनापासून कौतूक करत नसल्याचे दिसून आले आहे. विधू विनोद चोप्रा vidu vinod chopra हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक आहे. त्यांना एका प्रसिद्ध अभिनेत्रीविषयी असाच अनुभव आला. आणि त्यांनी तो एका मुलाखतीतून मांडला होता. ते नेमक्या कोणत्या अभिनेत्रीविषयी बोलले होते हे आपण जाणून घेऊयात.

केवळ आपल्या दिसण्यानं नाहीतर अभिनयानं बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. ९० च्या दशकांत अशा अनेक अभिनेत्री आल्या आणि प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करुन गेल्या. मनीषा कोईराला अशीच एक प्रतिभावान अभिनेत्री. काही काळ ती वादाच्या भोवऱ्यातही सापडली होती. मात्र तिनं आपल्या अभिनयावर लक्ष केंद्रीत करुन त्यापासून दूर राहणं पसंत केलं. वास्तविक कॅन्सर झाल्यानंतर मनीषा manisha koirala ही लाईमलाईटपासून दूरच होती. त्यानंतर तिच्या वाट्याला फारसे चित्रपटही आले नाहीत. मात्र तरीही जे चित्रपट तिनं केले त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला

विधु विनोद चोप्रा यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या बॉलीवूडविषयक वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला होता. त्यात त्यांनी एका अभिनेत्रीविषयी आपली प्रतिक्रिया दिली होती. ती अभिनेत्री म्हणजे मनीषा कोईराला. आज मनीषाचा वाढदिवस आहे. १६ ऑगस्ट १९७० मध्ये नेपाळ येथील काठमांडूमध्ये जन्म झालेल्या मनीषाचा बॉलीवूडमधील प्रवास काही सोपा नव्हता. मात्र तिनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं होतं. सौदागरपासून तिच्या बॉलीवूडच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलं नाही.

त्याचं झालं असं की, एका चित्रपटाचं ऑडिशन देण्यासाठी मनीषा गेली होती. तिचं ते ऑडिशन विधू विनोद चोप्रा यांनी घेतलं होतं. त्यांनी जेव्हा तिचं ऑडिशन पाहिलं तेव्हा ते नाराज झाले. आणि त्यांनी मनीषाला बोगस अभिनेत्री असं म्हटलं. हे ऐकून मनीषाला धक्का बसला होता. तिनं ही गोष्ट तिच्या आईला सांगितली होती. त्यांनाही या गोष्टीचं नवल वाटल्याचे मनीषानं एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं. मनीषानं या घटनेचा उल्लेख आपल्या ‘हिल्ड: हाऊ कँसर गेव मी ए न्यू लाइफ’ पुस्तकातही केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT