Manisha Rani esakal
मनोरंजन

Manisha Rani: मनीषा राणी ठरली 'झलक दिखला जा 11'ची विजेती! ट्रॉफीसह मिळाले लाखोंचे बक्षीस

Manisha Rani: मनीषा ही पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक आहे, जिने झलक दिखला जा या कार्यक्रमाचे विजेतेपद पटकावले आहे.

priyanka kulkarni

Manisha Rani: 'बिग बॉस ओटीटी 2' फेम मनीषा राणी (Manisha Rani) ही डान्स रिॲलिटी शो 'झलक दिखला जा सीझन 11' ( Jhalak Dikhhla Jaa 11) ची विजेती ठरली. मनीषा राणीने शोएब इब्राहिम, अद्रिजा सिन्हा, श्रीरामा चंद्रा आणि धनश्री वर्मा यांना हरवून 'झलक दिखला जा सीझन 11' च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. मनीषा ही पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक आहे, जिने झलक दिखला जा या कार्यक्रमाचे विजेतेपद पटकावले आहे.

ट्रॉफीसह मिळालं 30 लाखांचे बक्षीस

'झलक दिखला जा 11' ची विजेती मनीषा राणीला ट्रॉफीसह 30 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. मनीषाचा कोरिओग्राफर आशुतोष पवार याला देखील 10 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. याशिवाय मनीषा आणि आशुतोष यांना दुबईजवळील एका बेटावरच्या ट्रीपचे पॅकेज देखील देण्यात आलं आहे.

'बिग बॉस' मुळे मिळाली लोकप्रियता

'झलक दिखला जा' या कार्यक्रमाच्या आधी मनीषा राणीने 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' मध्ये भाग घेतला होता. या कार्यक्रमामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. सलमान खाननं होस्ट केलेल्या या शोची मनीषा राणी ही थर्ड रनरअप ठरली.

मनीषाची खास पोस्ट

'झलक दिखला जा 11'या कार्यक्रमाची ट्रॉफी जिंकल्यानंतर मनीषा राणीने इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. मनीषाने पोस्टमध्ये ट्रॉफीसोबतचे फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, "स्वप्ने खरी होतात. आज तुम्हा सर्वांचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द कमी आहेत. बिहारच्या एका छोट्या गावातल्या एका मुलीनं मोठी स्वप्ने पाहिली आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण भारत एकत्र आला. झलकच्या प्रवासात ज्यांनी मला इतकं प्रेम दिलं आणि ट्रॉफीही दिली त्या सर्वांचे आभार,खूप आनंदी होत आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT