Manny Coto Dies at 62 Writer-Producer on ’24’ and ‘American Horror Story,’  SAKAL
मनोरंजन

Manny Coto Dies: एमी विजेचा सुप्रसिद्ध निर्माता मेनी कोटो यांचे निधन, हा गंभीर आजार ठरलं कारण

मॅनीने वयाच्या ६२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला

Devendra Jadhav

Manny Coto Dies News: '24' या जगप्रसिद्ध मालिकेसाठी एमी पुरस्कार जिंकणारा मॅनी कोटोचे निधन झाले आहे. मॅनीने वयाच्या ६२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

वृत्तानुसार, मॅनीचा रविवारी त्याच्या पासाडेना येथील घरी मृत्यू झाला. मॅनी बर्याच काळापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते आणि हेच त्यांच्या मृत्यूचे कारण आहे.

(Manny Coto, Writer-Producer on ’24’ and ‘American Horror Story,’ Dies at 62)

मॅनी कोटो यांनी फॉक्सचे AI नाटक NeXT याची सह-निर्मिती केली. याशिवाय डेक्सटर, स्टार ट्रेक: एंटरप्राइज, अमेरिकन हॉरर स्टोरी आणि ईतर अनेक सिरीजचे ते निर्माते होते.

मॅनी कोटो यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. कुटुंबाच्या वतीने बोलत असलेल्या एका प्रतिनिधीने मॅनीच्या मृत्यूची पुष्टी केली आणि सांगितले की त्याने 13 महिने या कॅन्सरशी लढा दिला. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्याचे कुटूंब सोबत होते.

कोटोने शो टाइम मालिका 'ओडिसी 5' तसेच फॉक्स मालिका 'नेक्स्ट' ची निर्मिती केली आहे. त्याने 'डेक्स्टर'च्या शेवटच्या तीन सीझन आणि 'स्टार ट्रेक: एंटरप्राइज'च्या शेवटच्या दोन सीझनमध्येही अभिनयही केलाय.

विशेष गोष्ट म्हणजे कोटो यांनी 1992 च्या 'डॉ.' या सिरीजचे सह-लेखन आणि दिग्दर्शन केलं. कोटोच्या सुरुवातीच्या प्रोजेक्ट्समध्ये ख्रिस्तोफर मॅकडोनाल्ड स्टारर हॉरर थ्रिलर 'प्लेरूम'चा समावेश आहे.

याशिवाय डॉल्फ लुंडग्रेन स्टारर पॉलिटिकल थ्रिलर 'कव्हर-अप', फॅमिली साय-फाय फिल्म 'स्टार किड' आणि डिस्ने चॅनल फिल्म 'झेनॉन: द जेकिल' अशा सिनेमांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT