Manoj Bajpayee Bandaa Movie based on asaram bapu poonam  esakal
मनोरंजन

Bandaa Movie : राम जेठमलानी, सुब्रमण्यम स्वामींना गप्प करणारा 'बंदा' आहे तरी कोण?

मनोजच्या आगामी बंदा या चित्रपटाचा ट्रेलर आज सोशल मीडियावर येणार आहे. तेव्हापासून हा बंदा आहे तरी कोण अशी चर्चा सुरु झाली आहे.

युगंधर ताजणे

Manoj Bajpayee Bandaa Movie based on asaram bapu poonam : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅनमधील श्रीकांत व्यक्तिरेखेनं चाहत्यांना जिंकून घेतले होते. त्या मालिकेच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता त्याच्या तिसऱ्या सीझनचे वेध लागले आहे. अशातच मनोजच्या आणखी एका वेगळ्या विषयांवरील चित्रपटाची चर्चा जोरदार सुरु आहे.

मनोजच्या आगामी बंदा या चित्रपटाचा ट्रेलर आज सोशल मीडियावर येणार आहे. तेव्हापासून हा बंदा आहे तरी कोण अशी चर्चा सुरु झाली आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून ज्या मुख्य व्यक्तिरेखेवर आधारित हा चित्रपट आहे त्यानं देशातील प्रसिद्ध वकील राम जेठमलानी, सलमान खुर्शीद आणि सुब्रमण्यम स्वामींसारख्यांची बोलती बंद केली होती. त्यामुळे तो वकील भलताच चर्चेत आला होता. मनोजच्या बंदा चित्रपटातून त्याविषयी अधिक खुलासा होणार आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ही गोष्ट आहे राजस्थानमधील सेशन्स कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या पुनम चंद्र सोलंकी. बंदा या चित्रपटामध्ये ही व्यक्तिरेखा मनोज वाजेपयीनं साकारली आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या पोस्टरनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रेक्षकांना मनोजच्या या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे.

बंदाविषयी अधिक माहिती देताना मनोजनं दिलेल्या मुलाखतींमधून बंदाविषयीची उत्सुकता वाढली आहे. वकील पुनम चंद्रा ही व्यक्तिरेखा एवढी महत्वाची का आहे याचे कारण म्हणजे, आसाराम बापूंना झालेली अटक, त्यांचे जेलमध्ये जाणे, या केसमध्ये पुनम चंद्रा यांची वकील म्हणून असणारी भूमिका महत्वाची होती. याप्रकरणात सोलंकी यांना कोट्यवधी रुपयांचे अमिषही दाखवण्यात आले होते. मात्र ते आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाही.

अमर उजालामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार, मनोजनं सांगितलं आहे की, चित्रपटाचे शुटींग पूर्ण होईपर्यत सोलंकी आमच्यासोबतच होते. त्यांनी केलेल्या सुचना महत्वाच्या होत्या. त्यांना मी प्रश्न विचारला होता की, तुम्हाला ही केस घेण्यामागे काय भूमिका होती आणि तुम्हाला भीती वाटली नाही का... यावर ते म्हणाले, मला माझ्या लहान मुलीनी या घटनेच्या विरोधात लढण्याचे बळ दिले. आणि मी ती लढाई शेवटपर्यत सुरु ठेवली. मनोजनं देखील आपण हा चित्रपट त्या घटनेतील पीडितेला समर्पित करत असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT