मनोरंजन

Amruta Subhash : 'अमृताहुनी गोड...' मराठी अभिनेत्रीचं कौतुक करताना मनोज वाजपेयी थांबेना!

मराठी चित्रपट, नाट्य विश्वामध्ये आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणून अमृताचे नाव घ्यावे लागेल.

युगंधर ताजणे

Manoj Bajpayee Praised Amruta Subhash best Actress saas bahu achaar : मराठी चित्रपट, नाट्य विश्वामध्ये आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणून अमृताचे नाव घ्यावे लागेल. केवळ हिंदी, मराठीच नाहीतर वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये अमृतानं केलेला अभिनय हा चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे.

अमृताच्या सास बहु आचार प्रायव्हेट लिमिटेड चित्रपटाला मिळालेला पुरस्कार ही अमृतासाठी मोठी गोष्ट आहे. त्यातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आले. हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मनोजनं अमृताचं केलेलं कौतुक सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तो व्हिडिओ अमृतानं शेयर करुन व्यक्त केलेली भावनाही चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

मनोजनं अमृताचे कौतुक करताना म्हटले आहे की, अमृता खूपच गुणवान अभिनेत्री आहे. तिचं अभिनयाप्रती प्रेम आणि जिद्द खूपच कौतुकास्पद आहे. तिच्या अभिनयाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. मला तिला हा पुरस्कार देताना खूप आनंद होतो आहे. मी जेव्हा अमृता सुभाषचा किल्ला नावाचा चित्रपट पाहिला तेव्हा मी त्याचा फॅन झालो. मला तिचे काम खूपच आवडले. अशा शब्दांत मनोजनं तिचं कौतूक केलं आहे.

अमृतानं पुरस्काराला उत्तर देताना म्हटलं आहे की, आज मला कृतज्ञ व्हायचे आहे. आपली खूप स्वप्नं असतात. ती पूर्ण होतानाचा आनंद मोठा आहे. मनोज वाजपेयीचं प्रत्येक काम एक पाठशाळा वाटते. त्यांचं हे बोलणं म्हणूनच अनमोल आहे. सास बहु आचार प्रायवेट लिमिटेडसाठी मिळालेला हा पुरस्कार ही त्यासाठी महत्वाचा आहे.

सध्या मनोज वाजपेयीचा सिर्फ एक बंदा काफी है नावाचा चित्रपट झी ५ वर प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. बऱ्याच दिवसांपासून मनोज वाजपेयीच्या या प्रोजेक्टची चर्चा होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्यानं केलेल्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; २१०० रुपये कधीपासून मिळणार?

शेवटी त्यांचे सीन बसूनच व्हायचे... 'आई कुठे काय करते' करताना अशी झालेली कांचन आजींची अवस्था; मिलिंद गवळींचा खुलासा

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग, उत्पन्नातही मोठी वाढ; बळीराजा सुखावला

डॉक्टरांचे चुकीचे उपचार अन् शरीरभर इन्फेक्शन; थोडक्यात वाचली CID फेम मराठी अभिनेत्री "म्हणून मुलाला जन्म.."

Railway recruitment 2026 : रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी!, ११ हजारांहून अधिक ‘असिस्टंट लोको पायलट’ पदांवर भरती

SCROLL FOR NEXT