Manoj Bajpayee Net worth Esakal
मनोरंजन

Manoj Bajpayee:'ना मी दक्षिण मुंबईत राहतो..ना बान्द्रयात..',आपल्या १७० करोडच्या नेटवर्थवर स्पष्टच बोलला मनोज बाजपेयी

मनोज बाजपेयीचं नेटवर्थ १७० करोड रुपये आहे अशा बातम्या गेल्या काही दिवसांत जोर धरुन होत्या. त्यावर अभिनेत्यानं हैराण करणारं उत्तर दिलं आहे.

प्रणाली मोरे

Manoj Bajpayee Net worth: सिने-अभिनेता मनोज वाजपेयीचा 'एक बंदा ही काफी' हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या निमित्तानं केलेल्या मुलाखती दरम्यान मनोजनं अनेक प्रश्नांवर मोकळेपणानं भाष्य केलं.

जेव्हा मनोजला विचारलं गेलं की त्याची नेटवर्थ १७० करोड रुपये आहे का? तेव्हा त्यानं मजेदार उत्तर दिलं या प्रश्नावर. मनोज हा गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीत काम करतोय.अनेक सिनेमांतून त्यानं कामं केली आहेत. (Manoj Bajpayee reaction on his net worth rs 170 crore)

मनोज वाजपेयीला आपण नुकतंच कोर्टरुम ड्रामा 'सिर्फ एक बंदा काफी' मध्ये पाहिलं आहे. हा सिनेमा 'झी 5' वर २३ मे रोजी रिलीज झाला आहे. मनोज वाजपेयीनं अनेक सिनेमे आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. आता जेव्हा त्याला त्याच्या १७० करोडच्या नेटवर्थविषयी विचारलं गेलं तेव्हा त्याच्या उत्तरानं सगळ्यांना हैराण केलं.

मनोज वाजपेयीनं या प्रश्नावर खुलासा करत म्हटलं की, ''आता तो मुंबईच्या सबअर्बन विभागात राहतो''.

मनोज बाजपेयी म्हणाला,''ना मी साऊथ मुंबईत राहतो ..ना बान्द्यात राहतो. मी आजही लोखंडवाला अंधेरीमध्ये राहतो. मी नेहमीच म्हणतो की मी सिनेमा किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही. मी स्वतः हे निवडलं होतं. मी फिल्म इंडस्ट्रीच्या बाउंड्रीवर आहे. आणि हे मीच चॉइस केलं होतं. मला आत घुसायचं नाही''. मनोजनं या मुलाखतीत आपल्या सिर्फ एक बंदा ही काफी है याची जोरदार प्रशंसा केली.

मनोज वाजपेयीनं 'द फॅमिली मॅन' वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त या सीरिजमध्ये अनेक चांगले कलाकार पहायला मिळाले. समंथा देखील 'फॅमिली मॅन'च्या दुसऱ्या भागात खलनायिका म्हणून दिसली होती. मनोजनं रंगवलेला 'फॅमिली मॅन' प्रेक्षकांना भलताच आवडला. मनोजचं यानंतर सोशल मीडियावर फॅनफॉलॉइंग भलतंच वाढलं आहे. मनोज अनेकदा आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधताना दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT