manoj 
मनोरंजन

दोन वर्ष रखडलेला मनोज वाजपेयी स्टारर 'भोसले' सिनेमा अखेर होणार रिलीज

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- अभिनेता मनोज वायपेयी स्टारर 'भोसले' हा सिनेमा अखेर दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रिलीज होणार आहे. मनोज या सिनेमाचा सहनिर्माता देखील आहे. या सिनेमातील उत्कृष्ट अभिनयामुळे मनोजला गेल्या वर्षी 'एशिया पॅसिफिक स्क्रीन ऍवॉर्ड्स'मध्ये सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं होतं. या सिनेमात इप्शिता चक्रवर्ती सिंह, अभिषेक बॅनर्जी आणि मराठी अभिनेता संतोष जुवेकर मुख्य भूमिकेत आहेत.

काही दिवसांपूर्वी मनोज वाजपेयी स्टारर 'भोसले' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. अनुष्का शर्माच्या बहुचर्चित पाताल लोक या वेबसिरीजमध्ये ज्या अभिनेता अभिषेक बॅनर्जीने उत्तम भूमिका साकारली आहे तोच अभिनेता भोसले या सिनेमात बिहारमधील एका प्रवाश्याची भूमिका साकारत आहे. हा प्रवासी महाराष्ट्रातील रहिवासी आहे.

नुकत्याच रिलीज केलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अभिषेक बॅनर्जीच्या भूमिकेला खलनायकांद्वारे हाणामारी करत असल्याचं तसंच बदनाम करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत मराठमोळा संतोष जुवेकर आहे. संतोषच्या भूमिकेच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात केवळ मराठी सणंच साजरे केले जातील.

'भोसले' या सिनेमात मनोज वायपेयीचा जबरदस्त लूक पाहायला मिळतोय. नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारणा-या मनोजने या सिनेमात काका भोसले ही भूमिका साकारली आहे. मनोज यात ब्रेन ट्युमर या आजाराने ग्रस्त असतो इतकंच नाही तर तो या आजाराच्या चौथ्या स्टेजला असतो असं दाखवण्यात आलं आहे. 

'भोसले' या सिनेमाच्या रिलीजला आधीच दोन वर्ष उशीर झाला आहे. मात्र अखेर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज केला जाणार आहे. सोनी लीव्ह वर हा सिनेमा आज रिलीज होणार आहे.     

manoj bajpayee starrer film bhonsle will be released today on sony live  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT