manoj jarange movie sangharshayoddha poster launch at jalna antarwali sarati maratha reservation protest  SAKAL
मनोरंजन

Manoj Jarange Movie: आता संघर्ष मोठ्या पडद्यावर.. स्वतःच्या जीवनावरील चित्रपटाचे पोस्टर जरांगेंच्या हस्ते प्रदर्शित

आज जालना आंदोलनस्थळी मनोज जरांगेंनी सिनेमाचं पोस्टर लॉंच केलंय

Devendra Jadhav

ंManoj Jarange Movie News: मनोज जरांगेंनी आंदोलनाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. अशातच आज मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिलीय.

आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर आज जालना आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंच्या हस्ते त्यांच्या सिनेमाचं पोस्टर लॉंच झालंय. संघर्षयोद्धा असं या सिनेमाचं नाव असुन सिनेमात स्वतः मनोज जरांगे भुमिका साकारणार आहेत.

हा कलाकार साकारणार मनोज जरांगे पाटलांची भुमिका

आता संघर्ष मोठया पडद्यावर ..... मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरील चित्रपटाचं पोस्टर स्वतः जरांगे पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित झालंय. यावेळी जरांगे पाटील यांची भूमिका करणारे अभिनेते रोहन पाटील , लेखक , निर्माते गोवर्धन दोलताडे , दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आणि इतर कलाकार व सर्वच टीम उपस्थित होती.

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर सिनेमा

सामच्या वृत्तानुसार, मनोज जरांगे यांच्या जीवनावर चित्रपट बनवला जाणार आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या नावाने चित्रपट बनवणार असल्याची शक्यता आहे.

याशिवाय सिनेमाचं प्राथमिक नाव 'खळग' असल्याची माहिती मिळतेय. या सिनेमाच्या मेकिंगसाठी खळग चित्रपटाची टीम जरांगे यांच्या भेटीला गेली असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात स्वतः मनोज जरांगे पाटील हे सुद्धा भूमिका सााकारणार असल्याचं बोललं जातंय.

कधी सुरु होणार सिनेमाचं शुटींग

मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत सिनेमाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे करत आहेत. तर डी गोवर्धन दोलताडे सिनेमाचे निर्माते आहेत.

अभिनेता रोहन पाटील सिनेमात मनोज जरांगे पाटील यांची भुमिका साकारणार असं समजतंय. या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर २०२३ पासून सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल.

आजच मनोज जरांगे यांनी आंदोलनासंबंधी महत्वाचा निर्णय घेतला. आणि या पार्श्वभुमीवर मनोज जरांगेंच्या हस्ते संघर्षयोद्धा सिनेमाचं पोस्टर लॉंच करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate bail : मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना हायकोर्टाचा दिलासा; जामीन मंजूर, तूर्तास अटक टळली!

T20 World Cup तोंडावर असताना कर्णधारच बदलला! यजमान देशाच्या संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर

नशीब असावं तर असं! 'या' कंपनीच्या २० वर्षे जुन्या AC मध्ये ग्राहकांना सापडतंय सोनं, प्रकरण वाचून थक्क व्हाल!

Crime: मेव्हणीनं दाजीला तिची समस्या सांगितली; नंतर दोघांनी भयंकर कट रचला अन् एकाचा जीव गेला, काय घडलं?

IND U19 vs SL U19 SF: जेतेपदासाठी India vs Pakistan भिडणार? उपांत्य फेरीत माफक धावांचे लक्ष्य; श्रीलंका, बांगलादेशला अपयश

SCROLL FOR NEXT