Mansi Naik easkal
मनोरंजन

Mansi Naik Divorce: 'वाट माझी...'! शेवटी मानसी नाईकचा घटस्फोट!

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. त्याचे कारण सोशल मीडियावर तिच्या घटस्फोटाची रंगलेली चर्चा.

सकाळ डिजिटल टीम

Mansi Naik- प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही आता वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. त्याचे कारण सोशल मीडियावर तिच्या घटस्फोटाची रंगलेली चर्चा. गेल्या काही दिवसांपासून मानसीच्या कौटूंबिक वादाविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल होत होत्या. त्यावरुन चाहत्यांमध्ये चर्चाही सुरु झाली होती.

मानसीनं स्वताहून घटस्फोटाच्या चर्चेवर पडदा टाकला आहे. आणि त्याविषयी मोठा खुलासाही केला आहे. हिंदूस्तान टाईम्सशी बोलताना तिनं धक्कादायक बातमी चाहत्यांना दिली आहे. ती म्हणजे तिच्या घटस्फोटाची. आता घटस्फोटासाठी त्यासाठी कोर्टात अर्ज केला आहे असंही मानसी नाईकनं स्पष्टपणे सांगितलं आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर मानसी आणि तिच्या घटस्फोटाची चर्चा हा ट्रेंडिंगचा विषय होता. मराठी मनोरंजन विश्वामध्ये मानसीनं अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

सोशल मीडियावर मानसीचा चाहतावर्ग मोठा आहे. इंस्टावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशातच तिच्या अशाप्रकारच्या निर्णयानं सगळ्या फॉलोअर्सलाही धक्का बसला आहे. मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यात काही आलेबेल नसून दोघे घटस्फोट घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर मानसीनं काही स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. यामुळे नेटकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. अखेर त्यावर मानसीनंच स्पष्टपणे सांगितल्यानं त्याची चर्चा सुरु झाली आहे.

गेल्या वर्षी मानसी आणि प्रदीप यांनी लग्न केलं. मात्र अवघ्या दीड वर्षात दोघांमधील नात्याला पूर्ण विराम देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याचे चाहत्यांना देखील नवल वाटले आहे. त्यावरुन आता सोशल मीडियावर वेगवेगळया प्रतिक्रियांना उधाण आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे कायद्यानुसार नाही! नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल आणि सोनिया गांधींना दिलासा, EDच्या आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार

Fake Officer: ४ मैत्रिणी, ३ गरोदर, एक तर २० वर्षांची... पण तो IAS नव्हताच! अटकेनंतर धक्कादायक खुलासा!

Latest Marathi News Live Update : रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत 91 रुपयांवर

BHC Recruitment 2026: मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत मुंबई, नागपूर व संभाजीनगर खंडपीठात २,३३१ पदांची भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai News: खड्डेमुक्त रस्ते पुरवणे महापालिकांची जबाबदारी, उच्च न्यायालयाचे खडे बोल

SCROLL FOR NEXT