Mansoor Ali Khan- Trisha Krishnan Derogatory Comment Row  Esakal
मनोरंजन

Mansoor Ali Khan Refuses Apologize: माफी मागणार नाही, चुकीचं काहीच बोललो नाही! मन्सूरचा तोरा कायम

मन्सूरने मी काहीही चुकीचं बोललो नाही असं म्हणत माफी मागण्याच स्पष्ट नकार दिला आहे.

Vaishali Patil

Mansoor Ali Khan refuses apologize: : साउथ स्टार त्रिशा कृष्णन आणि मन्सूर अली खान यांच्यातील वाद हा काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्रिशा कृष्णनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मन्सूर अली खान बरिच टीका होत आहे. दक्षिणेतील अनेक कलाकारांनी मन्सूर अली खानच्या वक्तव्याचा विरोध करत त्याच्यावर सडकून टीका केली आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रीय महिला आयोगाने देखील याची दखल घेत मन्सूर विरोधात कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र इतक सगळं होऊन देखील मन्सूर त्याच्या मतावर ठाम आहे. त्रिशावर केलेल्या टिप्पणीमुळे मन्सूरला ट्रोल केलं जात आहे आणि त्याने माफी मागावी असं देखील मन्सूरला सांगण्यात येत आहे. मात्र मन्सूरने मी काहीही चुकीचं बोललो नाही असं म्हणत माफी मागण्याच स्पष्ट नकार दिला आहे.

मन्सूर अली खानने नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली आणि आपली बाजू मांडली आहे. त्याने त्रिशा कृष्णनबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यच्या वादावर बोलताना सांगितले की, " मी कोणाला वैयक्तिकरित्या बोललो नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता.

चित्रपटात दाखवण्यात येणारे बलात्कार किंवा हत्येचे सीन्स हे खरे असतात का? याचा अर्थ खरोखर एखाद्याचे शोषण होतं का? किंवा कुणाचा खून केला म्हणजे म्हणजे कोणाची तरी खरचं हत्या होते का? मला माफी मागायची काय गरज आहे? मी काहीही चुकीचं बोललो नाही. मी सर्व अभिनेत्रींचा आदर करतो."

मन्सूर अली पुढे म्हणाला, " मी माफी मागत नाही तोपर्यंत माझ्यावर तात्पुरती बंदी लादनं ही मोठी चूक त्या नादिगर संगमने केली आहे. असा निर्णय घेताना माझ्यासोबत चर्चाही झाली नाही. त्याने मला फोन करून खुलासा मागायला हवा होता किंवा नोटीस बजावायला हवी होती. चौकशी व्हायला हवी होती पण तसं झाले नाही."

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अलीकडेच मन्सूर अलीने त्रिशासोबतचा रेप सीन चित्रपटात न घडल्याबद्दल दु:ख व्यक्त केले होते. इतर हिरोंप्रमाणे तो तिला बेडरूममध्ये घेऊन जाऊ शकत नव्हता. असं तो म्हणाला होता.

त्यांच्या वक्तव्यानंतर त्रिशा कृष्णनने त्याच्यावर टीका करत ती कधीही त्याच्यासोबत काम करणार नसल्याचेही सांगितले. त्यानंतर चिरंजीवीसोबतच इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स त्रिशाच्या समर्थनार्थ पुढे आले होते.

मन्सूर अलीने माफी मागावी असा पावित्रा सर्वांनी घेतला मात्र आता मन्सूरने माफी मागण्यास स्पष्ट नकार दिल्याने हे प्रकरण आणखी वाढेल अशी चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT