Akash Thosar for anti-corruption campaign, did this thing  SAKAL
मनोरंजन

Akash Thosar: भ्रष्टाचाराविरोधी मोहिमेसाठी आकाश ठोसर मैदानात, केली ही गोष्ट

आकाश ठोसरने भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत सहभाग घेतलाय

Devendra Jadhav

Akash Thosar News: आकाश ठोसर हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. आकाशने आजवर अनेक सिनेमांंमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे. आकाश अभिनयासोबतच सामाजिक भान सुद्धा जपत असतो. आता आकाश भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत सहभाग घेणार आहे.

आपल्या आरोग्यासाठी फिटनेसला जवळ करणे जसे महत्वाचे असते, तसेच आपल्या देशाच्या आरोग्यासाठी भ्रष्टाचारापासुन दूर ठेवणे आवश्यक असल्याचे मत सैराट फेम लोकप्रिय अभिनेता आकाश ठोसर याने व्यक्त केले.

मुंबईत इंडियन बँकेच्या वतीने भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यासाठी वाॅकेथाॅन आयोजित करण्यात आली होती. यावेळी आकाश ठोसर उपस्थित होता बँकेचे श्री. एस. एस. पी.रॉय

श्री. वजाहात अली, मुख्य प्रबंधक, सरकारी व्यवसाय यांच्यासह बँक अधिकारी, कर्मचारी तसेच मुंबईकर नागरिकांसह सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर ही सहभागी झाला होता. यावेळी आकाश म्हणाला, "भ्रष्टाचाराविरोधात बोलायला हवं, छोट्या-छोट्या पावलांनीच सुरुवात होते, याविषयी बोललं पाहिजे. जमेल तिथे आवाज उठवला पाहिजे. फिटनेसच्या माध्यमातून केलेल्या या जनजागृतीमुळे नक्कीच फायदा होईल आणि अनेकजण सजग होतील."

अगदी पहाटे पहाटे आलेल्या मुंबईकर मंडळींसोबत आकाशने मरीन ड्राईव्ह इथे मनसोक्त फोटो सेशनही केले. लवकरच बहुचर्चित बाल शिवाजी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं आकाशने यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना आकाश फिटनेसबद्दलही। भरभरून बोलला. आपण प्रत्येकाने शरीराची काळजी घ्यायलाच हवी आणि त्यासाठी दररोज किमान एक तास व्यायामासाठी द्यायला हवा असे आकाशने सांगितले.

एकूणच जनजागृतीबद्दल आयोजित केलेल्या या वॉकेथॉनला फिटनेस फंडा आवडीने जपणाऱ्या आकाशच्या उपस्थितीने सर्वांचाच उत्साह वाढलेला दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT