aroh welankar  
मनोरंजन

आरोह वेलणकर झाला बाबा! चाहत्यांना सांगितली आनंदाची बातमी

स्वाती वेमूल

अभिनेता आरोह वेलणकर बाबा झाला असून सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. आरोहची पत्नी अंकिता हिने मुलाला जन्म दिला असून आई आणि बाळाची प्रकृती सुखरुप असल्याचं त्याने सांगितलं. 'मुलगा झाला', अशी पोस्ट त्याने शेअर केली असून सोशल मीडियावर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अलीकडेच त्याच्या पत्नीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. त्याने फोटो आरोहने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. आरोह आणि अंकिता जवळपास तीन वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले होते. आरोहचं हे लव्ह मॅरेज असून कॉलेजमध्ये त्याची आणि अंकिताची पहिली भेट झाली होती. 

२७ डिसेंबर २०२० रोजी आरोहने पत्नीच्या डोहाळ जेवणाचे फोटो पोस्ट केले होते. 'फक्त दोन महिने शिल्लक राहिलेत', असं त्याने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. त्यानंतर आता मुलगा झाल्याची पोस्ट लिहिताच प्रार्थना बेहरे, स्पृहा जोशी, गौरी नलावडे, धनश्री कडगावकर, भूषण प्रधान या सेलिब्रिटींनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. 

आरोहने प्रवीण तरडे लिखित 'रेगे' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केल्यानंतर आरोहने 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. सध्या तो 'लाडाची मी लेक गं' या मालिकेत अभिनेत्री मिताली मयेकरसोबत भूमिका साकारतोय. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अचानक मला पाहून शिंदे थबकले; संजय राऊत काय म्हणाले? दोघांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! शतक ठोकून मोडला बाबर आझमचा विक्रम, महाराष्ट्राचा संकटमोचक

Latest Maharashtra News Updates Live: सोलापूर जिल्ह्यात साखर कारखाना विरोधात रस्ता रोको

हळदीकुंकवात करंडे- फण्या देऊन कंटाळलात? डीमार्टमध्ये १५ रुपयापासून मिळतायत भन्नाट ऑप्शन; वाचा यादी

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रकल्पांना भूसंपादनाचे ग्रहण; शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासन चिंतेत

SCROLL FOR NEXT