Adinath Kothare Google
मनोरंजन

बॉलीवूडमध्ये वाढला आदिनाथ कोठारेचा डिमांड;प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिली ऑफर

कबीर खान दिग्दर्शित '83' या सिनेमात त्यानं क्रिकेटर दिलीप वेंगसरकरांची भूमिका साकारली होती.

प्रणाली मोरे

मराठीतले प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे(Mahesh Kothare) यांचा मुलगा म्हणूनच आदिनाथ कोठारेची (Adinath Kothare) ओळख काही वर्षापूर्वीपर्यंत होती. पण त्यानंतर हळूहळू आपल्या अभिनयाच्या,दिग्दर्शनाच्या माध्यमातून महेश कोठारेंच्या या सुपूत्रानं स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळवलं. आदिनाथ कोठारेचा गेल्या वर्षी बॉलीवूड डेब्यू झाला. कबीर खान दिग्दर्शित '83' ह्या बिग बजेट मल्टिस्टारर सिनेमातून आदिनाथ एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसला तर नागेश कुकनूर दिग्दर्शित 'सिटी ऑफ ड्रिम्स' ह्या वेबसीरीजमधून त्याने डिजीटल विश्वातही पदार्पण केले. आदिनाथ आता नव्या बॉलीवूड प्रोजेक्टमधून दिसणार असल्याचं बोललं जात आहे. बॉलीवूडमधील एका मोठ्या दिग्दर्शकानं आदिनाथला सिनेमाची ऑफर दिल्याची बातमी आहे. याविषयी त्याच्या चाहत्यांना उत्सुकता असतानाच त्याच्या रोहन सिप्पीसोबत नुकत्याच दिसलेल्या फोटोने आता ही उत्सुकता अधिकच वाढली आहे. खरंच,आदिनाथ रोहन सिप्पीसोबत काम करणार आहे?

हो,बातमी खरी आहे. '83' या सिनेमानंतर अभिनेता आदिनाथ कोठारे दिसणार आहे रोहन सिप्पीच्या नव्या बॉलीवूड प्रोजेक्टमध्ये. आदिनाथ स्वत: निर्माता-राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक असल्याने आपल्यासाठी भूमिकांच्या निवडीबाबत खूप चोखंदळ आणि सजग असल्याचं नेहमीच दिसून आलं आहे. बॉलीवूडमधून सातत्याने ऑफर्स येऊनही त्याने आपल्या डेब्यूसाठी कबीर खान आणि नागेश कुकनूरच्याच कलाकृतींची निवड केली. रोहन सिप्पी हे त्याच नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या यादीतले एक मोठे नाव आहे, ज्यांना संहितेविषयी उत्तम जाण आहे. अशावेळेस रोहन सिप्पींसोबत त्याने आपले नवे प्रोजेक्ट करणेही त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणायला हवी.

यासंदर्भात स्पष्टिकरण देताना आदिनाथ कोठारे म्हणाला,होय, ''मी रोहन सिप्पीच्या नव्या प्रोजेक्टमध्ये तुम्हांला दिसेन. रोहन सिप्पी माझ्या आवडत्या बॉलीवूड दिग्दर्शकांपैकी एक आहे. त्यामुळे रोहन सिप्पीच्या प्रोजेक्टचा हिस्सा होणं,नक्कीच सुखद म्हणावे लागेल. सध्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. यंदाच्या वर्षात हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Aquan Latest Update : बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्राला धोका आहे का? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

Pune News: पुण्यात रोज अतिक्रमणांवर हातोडा! ;पुढील दोन महिने कारवाई करण्याचा महापालिका आयुक्तांचा इशारा

Gokul Milk Price Hike : 'गोकुळ', 'वारणा' दूध विक्री दरात सहा रुपये वाढ; उद्यापासून अंमलबजावणी, म्हशीसाठी तीन, गायीसाठी दोन रुपये उत्पादकांना जादा मिळणार

Latest Marathi News Live Update : अक्वान चक्रीवादळाचा धोका वाढला; ओडिशा, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांना पावसाचा इशारा, वाऱ्याचा वेग ताशी ११० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता

वैभव सूर्यवंशीपासून हरमनप्रीत कौरपर्यंत... TIME Magazine च्या प्रतिष्ठित यादीत भारताच्या नऊ खेळाडूंना स्थान

SCROLL FOR NEXT