marathi actor kiran mane new post related shah rukh khan dunki movie  SAKAL
मनोरंजन

Kiran Mane: "ग्रामीण मोकळ्याढाकळ्या वागण्याची ठरवून माती केलीय..." मानेंची रोखठोक पोस्ट चर्चेत

किरण मानेंची नवीन पोस्ट चांगलीच चर्चेत आहे

Devendra Jadhav

Kiran Mane News: किरण माने शाहरुख खानचे किती मोठे चाहते आहेत हे तुम्हाला माहितच आहे. किरण मानेंनी आजवर अनेक पोस्टच्या माध्यमातून शाहरुख खानचं कौतुक केलंय. आता मानेंनी एका नवीन पोस्टच्या माध्यमातून शाहरुख खान आणि ग्रामीण - शहरी वातावरणावर खास पोस्ट केलीय.

किरण माने लिहीतात, "..मराठी मानूस अमेरीकेत र्‍हानारा असो नायतर मुंबैसारख्या मेट्रोशिटीत... त्यो अस्सल गांवाकडचा हाय, हे तुमी कसं वळखाल?"

किरण माने पुढे लिहीतात, "समजा तुमचं नांव 'प्रकाश' हाय. त्याची तुमच्याशी मैत्री झाली. काळजाच्या जवळ जागा मिळाली, की लगीच आपसूक तुमाला त्यो हाक मारनार 'ए पक्याS' ! गांवाकडच्या मानसानं आपल्या नांवाचा असा उल्लेख केला की समजायचं आपन त्याच्या मनात घर केलंय... माझा एक दोस्त एक्साइजमधी कमिशनर हाय, त्याला मी 'इज्या' अशी हाक मारतो, त्यो बी मला किरन्या म्हन्तो. आमचा मित्र 'सोन्या' सायबर क्राईम डिपार्टमेन्टमधला लै मोठा सायब हाय, तर इश्या स्काॅडलंडमधल्या कंपनीत सीईओ हाय !"

किरण माने पुढे सांगतात, "पशा इंजिनीयर हाय, राजा डाक्टर हाय, वशा प्राचार्य झालाय, रंज्या साखर कारखान्यावर डायरेक्टर, तर जया आमदार झालाय. या सगळ्या जिगरी दोस्तांनी 'किरण' अशी हाक मारली की मला सुरमई खाताना काटा लागल्यागत हुतं...

जे अस्सल गांवच्या मातीतले हायेत त्यांना ठावं आसंल, वडिलांना 'म्हातारं' म्हनायची रीत हाय. आम्ही काॅलेजमधी असताना आमचे फिजीक्सचे डुबल सर दिलीपकुमारचे फॅन होते, ते आमाला म्हनायचे, "काय बच्चन बच्चन करताय... आमचा दिलप्या बाप होता त्याचा. दाग बघा, नया दौर बघा...तोडलंय वाघानं."

किरण माने पुढे सांगतात, "मला वारकरी संप्रदायाचा लै लळा. आपली संतमंडळी लाडक्या इठूरायाला 'इठ्या' म्हनायची... "ज्ञानीयाचा वा तुक्याचा.. तोच माझा वंश आहे." तुकाराम महाराजांना तुक्या म्हन्ल्यावर आमाला तुकोबारायांच्या लेकरांना राग येत नाय... उलट माया वाढती. डाॅ. आंबेडकरांना कुनी 'माझा भिमा' म्हन्लं की माझं काळीज फुलुन येतं.

शहरी, सपक, अति मिळमिळीतपनानं, पुर्वापार चालत आलेल्या ग्रामीन मोकळ्याढाकळ्या वागन्याची ठरवून माती केलीय... ग्रामीण सोगळ्या वागन्या-बोलन्याला कमी लेखलंय... त्यात आपली खेड्यातनं शहरात गेलेली बांडगुळंबी सामील व्हत्यात. आता ह्या येड्या टाळक्यांना शाहरूख खानला आमी 'शारख्या' का म्हन्तो ते कसं कळनार?"

किरण माने शेवटी सांगतात, "...तीस वर्ष झाली या गोष्टीला. काॅलेजला दांडी मारून, सातार्‍यातल्या 'कृष्णा' टाॅकीजला 'कभी हा कभी ना' बघायला बसलोवतो. मी, पश्या, शाम्या, राजा आन् दिप्या... जसा 'दिवाSSSनाS दिल दिवानाSS' म्हनत आपला भाऊ आला... आमी पाचहीजन एका सुरात वराडलो, "शारख्या आला रेSSSSS"... टाळ्यांनी थिएटर हादरवलं. शाम्यानं पडद्याजवळ जाऊन शिट्ट्या मारल्यावत्या.. तवापास्नं त्यो आमचा 'शारख्या'च हाय. तवा माझ्या अळनी भावांनो, थंड घ्या. मी केलेल्या पोश्टींवर बातमी करताना न्यूज पोर्टल्सबी हेडलाईनमध्ये 'शारख्या' लिहायला लागल्यात, तिथं तुमची काय कथा? त्यो आमच्यासाठी कायम शारख्याच र्‍हानार. लब्यू शारख्या."

शाहरुख खानचा डंकी सिनेमा २२ डिसेंबरला सिनेमागृहात झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

R. Madhvan Parenting Tips: "मुलांना मोकळा वेळ देऊ नका!" आर. माधवनने दिल्या यशस्वी आणि शिस्तबद्ध मुलं घडवण्याच्या टिप्स

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Irregular Sleep Schedules: ८ तास झोपल्यानंतरही बिघडू शकतं का आरोग्य? जाणून घ्या झोपेचं योग्य वेळापत्रक का गरजेचं

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

SCROLL FOR NEXT