shah rukh khan 
मनोरंजन

'हे बघ भावा, तुझा पोरगा दोषी..'; मराठी अभिनेत्याची शाहरुखसाठी पोस्ट

आर्यनच्या जामिनावर सर्वच क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

स्वाती वेमूल

क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अखेर गुरुवारी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या जामिनानंतर सर्वच क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच 'मुलगी झाली हो' या मालिकेतील अभिनेता किरण माने यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. किरण माने यांची शाहरुखसाठीही ही पोस्ट सध्या चर्चत आहे.

किरण माने यांची पोस्ट-

'हे बघ भावा, तुझा पोरगा दोषी असंल तर कायद्यानं त्याला काय शिक्षा होईल ती भोगावी लागंल. पर्याय नाय. पन.. त्यो जर निर्दोष आसंल तर कुनाच्या बापाचा बाप बी त्याला शिक्षा करू शकत नाय! कायद्यापेक्षा मोठ्ठा मानूस पैदा झाला नाय या देशात अजून. पन नशिबाशी चाललेल्या या लढाईत तू जो संयम ठेवलायस तो पाहून तुझा लै लै लै अभिमान वाटला गड्या. तू मिडीयाफुडं यिवून घसा फाडून सोत्ताची बाजु मांडायचा धसमुसळेपना केला नाय. कुठल्या राजकिय नेत्याच्या किंवा पक्षाच्या वळचनीला जाऊन पोराच्या सुटकेची भिक मागितली नाय. या देशातल्या कुठल्याबी अधिकार्‍याचं डोळं पांढरं होत्याल एवढा पैसा चारून तू आतापर्यंत पोराला बाहेर काढू शकला असतास. पन तू ते नाय केलंस! तू लाच दिली असतीस तर पयल्याच सुनावनीला तो बाहेर असता. तू तारीख पे तारीख सहन करत वाट पहातोयस. कारन तुझा या देशातल्या 'कायद्या'वर विश्वास हाय!

..आपलं पोटचं पोर असल्या आरोपात अडकनं आनि आपन काहीच न करू शकनं याचं दु:ख - याची वेदना काय असते, ती ओळखायला आपन स्वत: मोठ्या मनाचा 'बाप' असनं गरजेचं असतं! कद्रू मनाची बांडगुळं मनाला यिल ती टीका करत्यात ती ऐकून तुझ्या काळजाला घरं पडत असत्याल. तू एकांतात हतबल होऊन रडतही असशील. पन तू बादशाह हायेस भावा. किंग खान हायेस, ते तू दाखवून देनार! आमचा तुझ्यावर विश्वास आहे, जे समोर येईल त्याला तू निधड्या छातीनं सामोरा जाशील!

लढ भावा लढ. तू लढवय्या हायेस. तुझ्या पोरानं गुन्हा केला असंल तर त्याला शिक्षा होईल. त्याचं खापर तुझ्यावर फोडन्याइतके भंगार मेंदूचे आम्ही नाही आहोत. तुझा पोरगा निर्दोष ठरला तर मात्र तुझ्यावर खोटे आरोप करनार्‍यांची थोबाडं ठेचली जानार आहेत. त्यावेळीबी तू 'माज' करनार नाहीस याची खात्रीय आमाला. कारन तू खर्‍या अर्थानं 'शाह'-रूख आहेस. राजा आहेस. हार कर जीतने वाला 'बाजीगर' आहेस! लब्यू दोस्ता.'

बॉलिवूडमधील अनेकांनी शाहरुखसाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत. 'एक पिता म्हणून मी खूप समाधानी आहे, देवाचे आभार', असं ट्विट अभिनेता आर. माधवनने केलं. तर अक्षय कुमार, सलमान खानसह इतरही कलाकारांनी गौरीला फोन करत तिची विचारपूस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT