Marathi Actor Lalit Prabhakar New Movie Tarri. Instagram
मनोरंजन

Lalit Prabhakar: 'नडणाऱ्यांची टर्रर्रर्रकन फाडायला...', ललित प्रभाकरच्या पोस्टनं वेधलं लक्ष

ललित प्रभाकरच्या नवीन सिनेमाची झलक पाहून जो-तो हैराण झाला आहे.

प्रणाली मोरे

Lalit Prabhakar: मराठी सिनेमातील सध्याचा हॅन्डसम अभिनेता म्हटलं की ललित प्रभाकरचं नाव डोळ्यासमोर येतं. मराठी मालिका आणि सिनेमांमधनं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत ललितनं आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. ललितच्या आजपर्यंतच्या सिनेमांवर नजर फिरवली तर बहुतांशी सिनेमातून त्यानं रोमॅंटिक हिरोच साकारला आहे आणि त्यात त्याला यशही मिळालं आहे.

पण आता पहिल्यांदाच ललित प्रभाकर अॅक्शन हिरोच्या भूमिकेत आपल्या सर्वांसमोर येणार आहे. आजच त्याच्या नवीन सिनेमाची एक झलक त्यानं सोशल मीडियावर पोस्ट केली अन् त्याचं बदललेलं रुप अनेकांना आवडलं देखील...चला,जाणून घेऊया ललितच्या या नव्या सिनेमाविषयी. (Marathi Actor Lalit Prabhakar New Movie Tarri.)

'टर्री' असं ललितच्या या नवीन सिनेमाचं नाव आहे. सिनेमाचं दिग्दर्शन महेश रावसाहेब काळे करणार आहे. या सिनेमात ललित टोटल दाक्षिणात्य सिनेमातील हिरोसारखा दिसत आहे. त्याचा रावडी लूक जबरदस्त दिसतोय. आणि अशा लूक मध्ये ललित प्रभाकर पहिल्यांदाच दिसत असल्यानं सर्वच स्तरातून कौतूक होतंय. ललितनं सिनेमाची पहिली झलक शेअर करताना पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ''त्याची नजर टर्री, त्याचा जिगर टर्री..! त्याला नडणाऱ्यांची टर्रर्रर्रकन फाडायला येतोय...टर्री!!!''

ललितच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनीच नाही तर मराठी इंडस्ट्रीतीलही अनेक दिग्ग्जांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

ललित प्रभाकर काही दिवसांपूर्वीच हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' या सिनेमातून आपल्या भेटीस आला होता. हा सिनेमा हवा तसा बॉक्सऑफिसवर चालला नसला तरी सनीच्या भूमिकेतील ललित मात्र रसिकांवर आपली छाप सोडून गेला. आता पहायचं की ललित प्रभाकरचा 'टर्री' सिनेमातील लूक प्रक्षेकांना किती भावतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT