pradeep patwardhan  esakal
मनोरंजन

Pradeep Patwardhan: ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे.

युगंधर ताजणे

Pradeep Patwardhan: मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. हदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचे निधन झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिलखुलास व्यक्तिमत्व, प्रभावी अभिनय, आणि लक्षवेधी संवादफेक यामुळे कायम प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या प्रदीप यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात मोकळी पोकळी निर्माण झाली आहे. प्रदीप यांच्या गाजलेल्या नाटकांमध्ये मोरुची मावशीचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.

मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिका यातून आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या प्रदीप यांची ओळख मोरुची मावशीमुळे प्रेक्षकांच्या मनावर ठसली होती. त्यामुळे त्यांना ओळखले जाऊ लागले. केवळ विनोदी भूमिकाच नाहीतर गंभीर स्वरुपाच्या भूमिका देखील त्यांनी तितक्याच प्रभावीपणे साकारल्या होत्या. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. गिरगावात राहणाऱ्या प्रदीप हे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वापासून अलिप्त होते. त्यामागील कारण त्यांचे प्रकृती अस्वास्थ्य असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. .

प्रदीप यांचा मनोरंजन विश्वातील प्रवास सांगायचा झाल्यास पहिल्यांदा उल्लेख करावा लागेल तो मोरुची मावशीचा. त्यानंतर त्यांनी नवसाचा, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. जे प्रेक्षकांना प्रचंड भावले. कॉलेज काळापासूनच एकांकिका स्पर्धेत त्यांनी काम केले. पुढे ते व्यावसायिक नाटकाकडे गेले. मराठी रंगभूमीवरील प्रतिभावान कलाकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी अनेक नाटकात, चित्रपटात आणि मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT