baloch , baloch film, pravin tarde, baloch release date SAKAL
मनोरंजन

Baloch Trailer: मराठे कधीही हरणार नाहीत... अंगावर शहारे आणणारा 'बलोच' चा ट्रेलर बघाच!

सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणारा 'बलोच'

Devendra Jadhav

Baloch Trailer Pravin Tarde News: अभिनेते - दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या सरसेनापती हंबीरराव सिनेमानंतर आगामी ऐतिहासिक सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती.

हा सिनेमा म्हणजे बलोच.. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या 'बलोच' सिनेमाची अनेकांना उत्कंठा शिगेला होती. अखेर बलोच बहुचर्चित टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

(marathi actor pravin tarde new marathi movie baloch teaser out now)

मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या 'बलोच' या चित्रपटाचा रोमांचक टिझर प्रदर्शित झालाय. विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर प्रस्तुत या चित्रपटाचे प्रकाश जनार्दन पवार दिग्दर्शक आहेत.

यात प्रवीण विठ्ठल तरडे आणि अशोक समर्थ प्रमुख भूमिकेत आहेत. प्रकाश जनार्दन पवार यांची कथा आणि पटकथा या चित्रपटाला लाभली आहे.

दत्ता काळे (डी के), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार सहनिर्माते आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार म्हणतात, ''पानिपतचा पराभव हा मराठ्यांच्या दृष्टीने मानहानी करणारा असला तरी मराठ्यांचे सळसळते रक्त त्यांना शांत बसू देत नव्हते.

अन्यायाला, अत्याचाराला सोमोरे जात त्यांनी शत्रुला चोख उत्तर दिले. मराठ्यांची हीच विजयगाथा मी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे .''

टिझरमध्ये चित्रपटाची भव्यता दिसत असून अंगावर शहारे आणणारा हा टिझर आहे. प्रवीण तरडे यांचे मनाला भिडणारे संवाद, मराठ्यांचे साम्राज्य टिकवण्यासाठीची तगमग दिसतेय.

पानिपतच्या लढाईत पराभव झाल्यानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळणाऱ्या मराठ्यांची व्यथा सांगणारा आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा 'बलोच' चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

प्रवीण तरडे यांचा २०२२ मध्ये आलेला धर्मवीर सिनेमा प्रचंड गाजला. प्रवीण तरडे शेवटी सरसेनापती हंबीरराव या सिनेमात हंबीरमामांच्या भूमिकेत दिसले.

याशिवाय वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमात प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांच्या रांगड्या ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहेत.

बलोच च्या माध्यमातून प्रवीण तरडे त्यांच्या अभिनयाची काय जादू दाखवणार याची उत्कंठा शिगेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT