sachin pilgaonkar 
मनोरंजन

Video : महागुरुंची ठसकेबाज लावणी;  'या रावजी..'वर धरला ठेका

सकाळ ऑनलाइन

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेते सचिन पिळगावकर त्यांच्या अभिनयाने आणि नृत्यशैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. अनेक चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून ते प्रेक्षकांच्या भेटीस येतात. नुकताच सचिन पिळगावकारांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडियोमध्ये ते लावणी करताना दिसत आहेत. एका रिअॅलिटी शोमध्ये सचिन पिळगावकर आणि त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांना गणपती उत्सवानिमित्त प्रमुख पाहुणे परीक्षक म्हणून बोलवले होते. त्या एपिसोडमध्ये सचिन आणि सुप्रिया यांचा खास अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळाला. सुप्रियांनी नाशिक ढोलच्या तालावर डान्स केला. तर सचिन यांनी लावणी सादर केली. त्यांचा लावणी करतानाची अदाकारी पाहून प्रेक्षक थक्क झाले. 

या रिअॅलिटी शोमधील परीक्षक मलायका अरोरा, टेरेन्स लुईस, गीता कपूर हे सर्व जण सचिन यांना लावणी करताना पाहून प्रचंड आनंदीत झाले. 'या राव जी बसा भावजी' या प्रसिध्द मराठी लावणीवर सचिन यांची अदाकारी पाहून त्या रिअॅलिटी शोमधील सर्वांनी त्यांचे कौतुक केले. हा व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल  झाला आहे. नेटकऱ्यांनी देखील सचिन यांच्या लावणीला पसंती दिली आहे.  

सचिन पिळगावकर यांच्या 'अशी ही बनवा बनवी', 'नवरा माझा नवसाचा', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'गंमत जंमत' या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी काम केले आहे. नदियाँ के पार, अखियों के झरोकों से, गीत गाता चल, बालिका वधू या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. तसेच अनेक डान्स रिअॅलिटी शोचे त्यांनी परीक्षण केले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B व्हिसावर ट्रंप प्रशासनाचा मोठा निर्णय; अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना बसणार मोठा फटका?

India vs Brazil Football: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ब्राझीलचा संघ जाहीर; व्हिनिशियस, राफीन्हा यांचीही ऐतिहासिक लढतीसाठी निवड

Maratha Reservation: ‘मुंबईला जाणारच’; १२ सप्टेंबरच्या बैठकीत कूचची तारीख ठरणार, मनोज जरांगेंचा निर्धार; भाऊबिजेला अमृता फडणवीसांच्या घरी जाणार

MPSC Exam: एमपीएससी परीक्षार्थींसाठी मोठी अपडेट; गट-क पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता ३ जानेवारीला होणार परीक्षा

Nagpur Weather: विदर्भाला उकाड्यापासून मिळणार दिलासा; शुक्रवारनंतर जोरदार पाऊस, तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT