Sandeep Pathak
Sandeep Pathak Instagram
मनोरंजन

Sandeep Pathak: 'आपल्या देशाचं राजकारण हे..',संदीप पाठकची पॉलिटिकल कमेंट चर्चेत

प्रणाली मोरे

Sandeep Pathak On Politics: नाटक, सिनेमा, मालिका, सूत्रसंचालन अशा विविध माध्यमांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता संदीप पाठकनं प्लॅनेट मराठीवरील 'पटलं तर घ्या' या चॅट शो दरम्यान आपल्या वैयक्तिक,व्यावसायिक आयुष्याविषयी बोलताना देशाच्या राजकारणावरही आपलं परखड मत व्यक्त केलं आहे.

संदीप पाठकनं सर्वसामान्यांच्या मनातला मुद्दा मांडला जेव्हा तो देशाच्या राजकारणावर बोलला. सध्या शो चा प्रोमो सोशल मीडियावर भलताच गाजतोय. उद्या १७ फेब्रुवारी रोजी 'पटलं तर घ्या' चा हा पूर्ण एपिसोड आपल्या भेटीस येत आहे. (Marathi Actor: Sandeep pathak on politics patla tar ghya chat show )

यावेळी या शोमध्ये पुष्कर श्रोत्री यांच्यासोबत संदीप पाठकही आहेत. ‘आपल्या देशाचं कालचं, आजचं आणि उद्याचं राजकारणही रस्ते देऊ, पाणी देऊ आणि वीज देऊ याभोवतीच फिरणार आहे. यातून आपण कधी बाहेर पडणार आहोत, असा प्रश्न या शोमध्ये संदीप पाठक यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे यंदाच्या एपिसोडमध्ये वातावरणात थोडं गांभीर्य येणार आहे

या भागात पुष्कर आणि संदीप यांनी त्यांच्या कारकिर्दीतील काही धमाल किस्से शेअर केले आहेत. सोबतच सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरही आपली परखड मतं व्यक्त केली आहेत. त्यामुळे यावेळचा 'पटलं तर घ्या विथ जयंती'चा भाग जबरदस्त असणार हे नक्की !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT