Sharad Ponkshe 
मनोरंजन

शरद पोंक्षेंचं वेबविश्वात पदार्पण; पर्ण पेठेही साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

शर्वरी जोशी

शरद पोंक्षेंचं वेबविश्वात पदार्पण; पर्ण पेठेही साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण करणारे अभिनेता म्हणजे शरद पोंक्षे. चित्रपट, नाटक आणि मालिका अशा माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या शरद पोंक्षे यांनी आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. त्यातच काही काळापूर्वी कर्करोगासारख्या असाध्य आजारावर मात करत पुन्हा एकदा त्यांची पावलं चित्रपटसृष्टीकडे वळली आहेत.  विशेष एक म्हणजे लवकरच ते वेबविश्वात पदार्पण करणार आहेत. 

प्लॅनेट मराठीच्या आगामी वेबसीरिजमध्ये शरद पोंक्षे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.   कौटुंबिक कथेवर आधारित असलेली ही सीरिज सहा भागांची आहे. अगदी तुमच्या आमच्या कुटुंबात घडणाऱ्या घटना या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. सध्या या सारिजचं नाव गुलदस्त्यात असून यात शरद पोंक्षेसोबत अनेक दिग्गज कलाकार मंडळी झळकणार आहेत. 

 ''आजवर हाताळलेल्या विषयांपेक्षा हा जरा वेगळाच विषय आहे. ही वेबसीरिज प्रेक्षक आपल्या आयुष्याशी कुठेतरी जोडू शकतात. ही सीरिज ज्या विषयावर आधारित आहे, तो विषय खरोखरच गंभीर होता. मात्र तरीही आम्ही या गंभीर विषयाला विनोदाची जोड देत, अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने हा विषय मांडला आहे. अभिनयात पूर्ण मुरलेले कलाकार असल्याने या सर्व जणांनी आपापल्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे,'' असं प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर म्हणाले. 

अशी असेल स्टारकास्ट

शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, तेजस बर्वे, पर्ण पेठे, उदय नेने अशी दमदार स्टारकास्ट असलेली ही वेबसिरीज कौटुंबिक आणि विनोदी स्वरूपाची असणार आहे. 

दरम्यान, या सीरिजची निर्मिती वर्जिनोशन्स करत असून दिग्दर्शन अमित कान्हेरे करत आहेत. तर, प्रतिक व्यास, अमित कान्हेरे यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT