marathi actor vinamra bhabal wedding with pooja attend marathi actress hruta durgule SAKAL
मनोरंजन

Vinamra Bhabal Wedding: 'मन उडू उडू झालं' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याचं थाटामाटात लग्न

'मन उडू उडू झालं' मालिकेतील अभिनेत्याने थाटामाटात लग्न केलंय

Devendra Jadhav

Vinamra Bhabal Wedding News: मन उडू उडू झालं मालिकेत अजिंक्य राऊतच्या मित्राच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता विनम्र भाबळने थाटामाटात लग्न केलंय. विनम्रने नातेवाईक आणि मित्रमैत्रीणींच्या उपस्थितीत लग्न केलंय.

विनम्रच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार उपस्थित होते. विनम्रने सर्वांसोबत खास फोटोशूट करुन सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

विनम्रच्या बायकोचं नाव आहे पूजा. विनम्रने पूजासोबत काल ८ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. विनम्रच्या लग्नाला हृता दुर्गुळे उपस्थित होते. याशिवाय रिना मधुकर, पुर्णिमा तळवलकर, प्राजक्ता परब असे कलाकार उपस्थित होते.

विनम्रच्या मन उडू उडू झालं मालिकेतील बरेचसे कलाकार त्याच्या लग्नाला उपस्थित होते. विनम्र आणि पूजाने पारंपरिक पद्धतीने एकमेकांशी लग्नगाठ बांधली.

विनम्रच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायच झालं तर त्याने, माझे पती सौभाग्यवती, फुलपाखरु अशा मालिकांमध्ये काम केलंय. याशिवाय जगा वेगळी अंतयात्रा, येरे येरे पैसा अशा मराठी सिनेमांमध्ये विनम्र झळकला आहे.

विनम्र सध्या अंशुमन विचारेसोबत 'राजू बन गया जंटलमन' नाटकात अभिनय करतोय. विनम्र एक रीलस्टार म्हणूनही लोकप्रिय आहे. विनम्रच्या लग्नाबद्दल त्याचे चाहते त्याचं कमेंटमध्ये अभिनंदन करतेय.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT