marathi aishwarya narkar ameya trusha nayak 
मनोरंजन

सासू ऐश्वर्याने केलं सुनेला पसंत? कमेंटमुळे रंगलीय चर्चा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या सौदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्याचे पती अविनाश नारकर हेसुद्धा उत्तम नट आहेत. ही जोडी  'श्रीमंता घरची सून' या मराठी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

ऐश्वर्या आणि अविनाश यांचा मुलगा अमेय नारकर हा मॉडेल आहे. त्याच बरोबर तो विविध थिएटर ग्रुपसोबत काम करतो. अमेय सोशल मिडीयावर खूप अॅक्टिव असतो. त्याच्या सोशल मिडीयावर तो तृषा नायक सोबत फोटो पोस्ट करत असतो. तृषा नायकचा अनमयीवस्त्र हा कपड्यांचा ब्रॅाण्ड आहे. अमेय सोशल मीडियावर तृषाचे फोटो नेहमी पोस्ट करतो. तसंच त्याला वेगवेगळे कॅप्शनही देत असल्यानं दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत अशी चर्चा रंगली होती.

तृषाच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा डीपी फोटोसुद्धा अमेयासोबत आहे. लॉकडाऊनमध्ये तृषा आणि अमेय एकत्र होते तेव्हा ते दोघे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत होते. अमेयने  तृषासोबत एक खास फोटो पोस्ट केला होता 'बहीण भाऊ वाटतो असे कॅप्शन दिले होते. बहीण भाऊ नाही तर मग कोण आहात? असा प्रश्न सर्वानी विचारला तेव्हा पासून त्या दोघांच्या नात्याची चर्चा सुरु झाली.

दरम्यान या दोघांचे ब्रेकअप झाले असंही म्हटलं जात होतं. पण काही दिवसापूर्वी अमेयने तृषाचा एक खास फोटो पोस्ट केला होता. ऐश्वर्याने हार्ट्सचे ईमोजी पाठवून कंमेंट केली होती. या कमेंटमुळे आता सून पंसत आहे अशी चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War Ceasefire: ''इराणने अमेरिकेवर डागलेल्या शंभराहून अधिक मिसाईल्स पाकिस्तानी'', शांतिदूत समजणाऱ्या पाकचे निघाले वाभाडे

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

Khed Karanjavihire road safety: खेंगलेवस्ती परिसरात उघडी विहीर, वाढत्या वाहतुकीत दुर्घटनेचा धोका; प्रशासन व जागा मालक सुस्त

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT