Amruta Khanvilkar
Amruta Khanvilkar Google
मनोरंजन

अमृता खानविलकर बनलीय चंद्रमुखी;आता भल्याभल्यांची बत्ती होणार गुल...

नीलेश अडसूळ

आपल्या अदाकारीने भल्याभल्यांना वेड लावणारी 'चंद्रा' कोण आहे याची भलतीच उत्सुकता मराठी चित्रपट विश्वात होती. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक दिग्दर्शित (Prasad Oak ) 'चंद्रमुखी' ( Chandramukhi) या चित्रपटातील 'चंद्रा' नेमकी कोण आहे, याविषयी अनेक चर्चा सुरु होत्या. चित्रपटाचे पोस्टर याआधीच जाहीर झाले होते परंतु त्यामध्ये 'चंद्रा' कोण हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. मग चित्रपटातील लावणीचा व्हिडीओ देखील आला परंतु त्यातही अभिनेत्री कोण हे दाखवण्यात आले नाही. अखेर ही 'चंद्रा' कोण याचा उलगडा झाला आहे.

या चंद्रमुखीला जगासमोर आणण्यासाठी नुकताच एक भव्य सोहळा पार पडला. यावेळी ३५ फुटांच्या पोस्टरचे अनावरण करून चंद्राच्या नावाचा खुलासा करण्यात आला. लावण्यवती चंद्रा दुसरी तिसरी कुणी नसून आपली लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर (amruta khanvilkar) आहे. चंद्राला पाहण्यासाठी यावेळी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. सोनाली खरे, क्रांती रेडकर, पूजा सावंत, महेश कोठारे, समीर चौगुले, मृणाल कुलकर्णी यांच्यासह संगीत दिग्दर्शक अजय- अतुल देखील उपस्थित होते.

या चित्रपटात 'खासदार दौलत देशमाने' ही भूमिका अभिनेता आदिनाथ कोठारे साकारत आहे. ( adinath kothare) या आधी एक खास प्रोमोतून आदिनाथची ओळख करून देण्यात आली होती. राजकारणात मुरलेला नेता खासदार दौलत देशमाने आणि लावणी कलावंत 'चंद्रा' ची ही प्रेमकहाणी आहे. त्यामुळे आदिनाथ कोठारे याने 'चंद्रमुखी'चा चेहरा सर्वांसमोर उघड केला. यावेळी ३५ फुटी पोस्टरवर लावण्यवती चंद्रा म्हणजेच अमृताचे छायाचित्र लावण्यात आले होते. सध्या हे पोस्टर समाजमाध्यमांवर गाजत आहे.

चित्रपटाचा हा सोहळा एक पर्वणी होती. आकर्षक रोषणाई, रंगीत पताके, कपड्यांच्या झालरी, तिकीटबारी आणि समोर तमाशाचा स्टेज असा अस्सल ग्रामीण भागात पाहायला मिळणारा तमाशाचा फड काल मुंबईतील ऑपेरा हाऊस येथे सजला होता. सोबत अत्तरा सुवास, फेटा बांधलेला रसिकवर्ग, पानाचा विडा अशी व्यवस्थाही यावेळी करण्यात आली होती. या नेत्रदीपक वातावरणात जेव्हा घुंगरू वाजू लागले तेव्हा रसिक अक्षरशः घायाळ झाले. गण, गवळण, बतावणी अशी दर्जेदार मैफल यावेळी रंगली. अमृता खानविलकर (amruta khanvilkar) हिने आपल्या मोहक अदाकारीने लावणी सादर करून उपस्थितांना वेड लावले.

चित्रपट काय आहे?

प्रसाद ओक (prasad oak) दिग्दर्शित 'चंद्रमुखी' हा चित्रपट विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या पुस्तकावर बेतलेला आहे. एका राजकारणी व्यक्तीची आणि लावण्यवतीची ही प्रेमकथा असून अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाला अजय अतुल (ajay atul) यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटातील 'चंद्रा' हे गीत श्रेया घोशाल (shreya ghoshal) हिने गायले आहे. तर पटकथा आणि संवाद चिन्मय मांडलेकर यांनी लिहिले आहेत. येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT