marathi actress amruta khanvilkar memorable mauritius trip photos viral  SAKAL
मनोरंजन

Amruta Khanvilkar: अमृता पडली या परदेशी बीचच्या प्रेमात, सोशल मीडियावर शेअर केले भन्नाट फोटो

अमृताच्या नवीन फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय

Devendra Jadhav

Amruta Khanvilkar News: अमृता खानविलकर ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री. अमृताला आपण आजवर अनेक मालिका, सिनेमे, वेबसिरीजमधून अभिनय करताना पाहिलंय.

अमृताचे विविध फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात. अमृताचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अमृताच्या फोटोंवर नजर मारली, तर अमृता एका परदेशी बेटावर फिरायला गेली आहे.

अमृता खानविलकर मॉरिशसला गेली आहे. अमृताने मॉरिशसच्या समुद्रकिनाऱ्यावरचे सुंदर फोटो शेअर केलेत. अमृता हे फोटो शेअर करत लिहीते, "खुप भन्नाट ट्रीप. खुप आठवणी. थोडीशी वाळू. खुप सूर्यप्रकाश आणि भन्नाट ट्रीप. मैत्रीणींसोबत केलेली मजा आणि रात्रभर मारलेल्या गप्पा. श्रेया सारखी नवी मैत्रीण मला मिळालीय. मॉरिशियन फूड आणि गोड पदार्थ अत्यंत चविष्ट..

मॉरिशस ही एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला सारखं सारखं यावंसं वाटेल. सध्या तरीही मी निरोप घेतेय मॉरिशसचा पण पुन्हा नक्कीच येईल."

अशाप्रकारे अमृता (Mauritius) मॉरिशसच्या प्रेमात आहे असं म्हणता येईल.

अमृताचे आगामी सिनेमे...

अमृता खानविलकर आगामी कलावती सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा हॉरर कॉमेडी असल्याचं सांगितलं जातंय.

याशिवाय अमृता खानविलकर प्रसाद ओकसोबत आगामी सिनेमात एकत्र झळकणार आहेत. हा सिनेमा म्हणजे पठ्ठे बापूराव. शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र 'पठ्ठे बापूराव' या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहे.

या चित्रपटात अमृता खानविलकर “पवळा” च्या भूमिकेत दिसणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण सोशल मीडियावर करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Census: जनगणनेत जात सांगणं अनिवार्य नाही! देशात पहिल्यांदाच डिजिटल सेन्सस; ११ हजार ७१८ कोटी मंजूर

Pregnancy Prep 2026: पुढच्या वर्षी प्रेग्नेंसी प्लॅन करताय? मग 2025 संपण्याआधीच बदला 'या' ५ महत्त्वाच्या सवयी

Viral Video: देशाच्या पहिल्या डॉनची मुलगी त्रस्त; मोदी आणि शहांकडे न्यायाची मागणी, काय घडलं? पाहा भावनिक व्हिडिओ व्हायरल

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी ३९४६ मतदान केंद्रांची तयारी; प्रत्येक ९०० मतदारांसाठी एक केंद्र

Silver Price Today : अरे बापरे! चांदीचा भाव 2 लाखांवर; वर्षात दिला तब्बल 121% रिटर्न! भाव आजून वाढणार का?

SCROLL FOR NEXT