Actress Deepa parab Podcast Esakal
मनोरंजन

Podcast: 'डिलाईल रोडचा 'तो' बसस्टॉप आणि आम्ही दोघं..', दीपा परबनं सांगितली अंकुश सोबतची खास आठवण

ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत 'तू चाल पुढं..; फेम अभिनेत्री दीपा परबनं तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Actress Deepa parab Podcast: सध्या झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं...' मालिकेत अश्विनी या मध्यवर्ती भूमिकेच्या माध्यमातून अभिनेत्री दीपा परबनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर दीपानं पुन्हा मालिकेतनं पदार्पण केलं आहे.

वयाच्या चाळीशीनंतर कमबॅक करताना नेमका काय फरक जाणवतो किंवा यानं अभिनेत्री म्हणून काम करताना फरक पडतो का यावर दीपानं थेट भाष्य केलं आहे. ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत दीपानं आपला नवरा अभिनेता अंकुश चौधरी सोबतच्या लव्हस्टोरीला उजाळा देताना लग्नाआधीच्या काही खास आठवणी देखील शेअर केल्या आहेत.

याच मुलाखतीत आपल्याला बायोपीकमध्ये काम करायची संधी मिळाली तर ती व्यक्तिरेखा कोणाची असेल यावर देखील दीपा परबनं खुलासा केला आहे. दीपा परबनं ईसकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीची लिंक बातमीत जोडली आहे.

याच ईसकाळ मुलाखतीत दीपानं तिच्या आणि अंकुशच्या लव्हस्टोरीविषयी ,त्यांच्यातील बॉन्डिंगविषयी काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. डिलाईल रोडच्या बसस्टॉपवरच्या काही रोमॅंटिक आठवणी शेअर करताना दीपानं दोघांमधील भांडणाचा तो बसस्टॉप कसा साक्षीदार आहे याविषयीचे काही किस्से शेअर केले आहेत. हा भन्नाट किस्सा ऐकायला तुम्हाला बातमीत जोडलेल्या मुलाखतीच्या लिंकवर क्लीक करावं लागेल.

'तू चाल पुढे..' या मालिकेत काम करणाऱ्या दीपा परबला आता सिनेमा,नाटकही खुणावतायत. इतक्या वर्षांच्या ब्रेकनंतर इंडस्ट्रीत आल्यानंतर तिला मनासारखं नाटक आणि बायोपीक करायची इच्छा आहे. तिनं बायोपीकसाठी भूमिकाही मनात पक्की केलीय.

तर पुनरुज्जीवित नाटकात काम करायचं झाल्यास कुठल्या नाटकात काम करायला आवडेल याविषयी देखील दीपा परबनं खुलासा केला आहे. आता इतके सगळे इंट्रेस्टिंग खुलासे ऐकायचे म्हणजे पॉडकास्ट मुलाखत तर ऐकावी लागेलच नाही का.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT