divya subhash, mulgi zali ho, Man Dhaga Dhaga Jodate Nava, star pravah SAKAL
मनोरंजन

Man Dhaga Dhaga Jodate Nava: 'घटस्फोट शेवट नसून नवी सुरुवात' नवी कोरी मालिका.. स्टार प्रवाहवर भेटीला

मुलगी झाली हो मालिकेनंतर दिव्याला आणखी एका नव्या मालिकेची लॉटरी लागली आहे

Devendra Jadhav

Man Dhaga Dhaga Jodate Nava New Serial: मुलगी झाली हो मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर. दिव्याने मुलगी झाली हो मालिकेत बोलता येऊ न शकणाऱ्या माऊची भूमिक साकारली.

काहीच दिवसांपूर्वी मुलगी झाली हो मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता मुलगी झाली हो मालिकेनंतर दिव्याला आणखी एका नव्या मालिकेची लॉटरी लागली आहे.

दिव्याच्या नवीन मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला असून मन धागा धागा जोडते नवा असं या मालिकेचं नाव आहे.

(marathi actress divya subhash from mulgi zali ho new serial man dhaga dhaga jodate nava coming soon on star pravah)

मुलगी झाली हो, रंग माझा वेगळा, आई कुठे काय करते यासारख्या मालिकांमधून स्टार प्रवाहने वेगळा विषय हाताळत मनोरंजन विश्वात नवा प्रयोग केला आणि तो यशस्वीही झाला.

मन धागा धागा जोडते नवा ही मालिका घटस्फोट या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार आहे.

या नव्या प्रयोगाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘स्टार प्रवाहने आजपर्यंत नेहमीच ज्वलंत आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना घेऊन वेगवेगळ्या मालिका बांधल्या आहेत आणि त्या रसिकांसमोर सादर केल्या आहेत.

या कथा आणि आणि ही पात्र रसिकांना आवडण्यामागचं कारण हेच आहे की त्या खऱ्या वाटतात आणि तो प्रवास एक नवी ऊर्जा देतो.

अश्याच एका महत्त्वाच्या विषयावर आता स्टार प्रवाह वाहिनी मालिका घेऊन येतेय आणि तो विषय आहे घटस्फोट, एका मुलीचा घटस्फोट.

प्रत्येक घटस्फोटित मुलासाठी, मुलीसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मन धागा धागा जोडते नवा ही मालिका एक प्रेरणादायी मालिका असेल याची आम्हाला खात्री आहे.’

स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो मालिकेतून घराघरात पोहोचलेली माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या मन धागा धागा जोडते नवा या नव्या मालिकेत दिव्या आनंदी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

इतरांना भरभरुन आनंद देणारी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेत्री दिव्या पुगावकर प्रचंड उत्सुक आहे.

मन धागा धागा जोडते नवा हि नवी मालिका ८ मे पासून सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर बघायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT