marathi actress gautami deshpande wedding mehendi photos viral with boyfriend  SAKAL
मनोरंजन

Gautami Deshpande: गौतमी देशपांडे करणार लग्न! मेहंदीचे फोटो व्हायरल, कोण आहे होणारा नवरा?

गौतमी देशपांडेने लवकरच लग्न करणार असल्याची गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केलीय

Devendra Jadhav

Gautami Deshpande Wedding Updates: गौतमी देशपांडे ही सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते. माझा होशील ना मालिकेतून गौतमी घराघरात लोकप्रिय झाली. गौतमीने नुकतीच तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. गौतमी लग्न करत आहे.

गौतमीने सोशल मीडियावर मेहंदीचे खास फोटो शेअर करत सर्वांना ही गुड न्यूज दिलीय. कोण आहे गौतमीचा होणारा नवरा? जाणून घ्या.

गौतमी देशपांडे करणार लग्न!

गौतमीने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर मेहंदीचे फोटो शेअर केलेत. गौतमीने हे फोटो शेअर करताना लिहिलंय की, माझ्या सिक्रेट सांताचं आगमन थोडं लवकर झालंय. खुप आनंद आणि प्रेम असं कॅप्शन देत गौतमीने ही खास बातमी शेअर केलीय.

कोण आहे गौतमीचा होणारा नवरा?

गौतमी देशपांडे तिचा बॉयफ्रेंड स्वानंद तेंडूलकर सोबत लग्न करणार आहे. स्वानंद हा एक इनफ्लुएन्सर आणि सोशल मीडिया स्टार आहे. स्वानंद भाडिपा या प्रसिद्ध युट्यूब चॅनलमध्ये सक्रिय आहे. स्वानंद एक डिजीटल क्रिएटर असून त्याचे अनेक रिल्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. गौतमी - स्वानंदच्या चाहत्यांनी त्यांचं कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदन केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur University: शॉकिंग अपडेट! पुण्यश्लोक होळकर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब; संशोधनातील आकडे पाहून थक्क व्हाल

Crime News : नोटाबंदीनंतरही ४०० कोटींच्या जुन्या नोटा? घोटी पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

Rishabh Pant Replacement : रिषभ पंतच्या जागी कोणाला संधी? ना इशान, ना संजू; BCCIने जाहीर केलं दुसरंच नाव

Harshvardhan Sapkal: भाजप, राष्‍ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कळीचा नारद!

Soldier Death:जवानाच्या चितेला अग्नी देण्यासाठी ८ तासांच बाळ अन् पत्नी स्ट्रेचवरून आली, सातारा हळहळला; मुलीचा चेहरा पाहण्याआदीच मृत्यूने गाठलं...

SCROLL FOR NEXT