hemangi kavi, hemangi kavi post, mothers day 2023, hemangi kavi family SAKAL
मनोरंजन

तिच्यासारखं ५०% सौंदर्य मला मिळालं असतं तर? हेमांगी कवीची Mothers Day निमित्ताने भावुक पोस्ट

Mothers Day 2023: पण आपण पडलो मातृमुखी..! हेमांगी कवीची मदर्स डे निमित्ताने भावुक पोस्ट

Devendra Jadhav

Hemangi Kavi Special Post on Mothers Day 2023: आज मदर्स डे.. जगातली तमाम मुलं त्यांच्या आईसाठी हा दिवस नक्कीच खास करण्याचा प्रयत्नात असतील.

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आईसाठी खास पोस्ट करत आहेत.

अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या आईसाठी खास पोस्ट केलीय. हेमांगीने आईसाठी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालीय.

(marathi actress Hemangi Kavi Special emotional Post on Mothers Day 2023)

हेमांगीने आईसोबतचा फोटो पोस्ट करून लिहिलंय की..."Mummy! जगातली सुंदर स्त्री! प्रत्येकाला असं वाटतं पण माझी आई खरंच सुंदर आहे.

तिच्यासारखं ५०% सौंदर्य मला मिळालं असतं तर? पण आपण पडलो पितृमुखी! म्हटलं सौंदर्य नाही तर नाही बाकी गुण तरी घेऊयात. काही गुण अनुवंशिक आलेत काही अथक प्रयत्नांनी आणलेत. तरी ही तुझी सर नाहीच.

हेमांगी पुढे लिहिते.. "तुझ्यासारखा त्याग, परिवारासाठी असलेली माया, प्रेम, पप्पांना डोळे झाकून दिलेली साथ, संसारात घेतलेले कष्ट, संपाच्या काळात दाखवलेला संयम, घरात किती भांडणे झाली तरी पाहुणे,

नातेवाईक घरी आले की जणू काही झालंच नाही म्हणून केलेलं त्याचं स्वागत, घरात किती ही माणसं आली तरी त्यांच्यासाठी केलेला स्वंयपाक, महीनाआखिरीला पैसे नसले तरी तुझं खंबीर असणं"

हेमांगी आईबद्दल पुढे लिहिते.. "प्रत्येक परिस्थितीला हसत मुखाने सामोरी जाणं, व्यवहारज्ञान, तल्लख बुद्धी (माझी आई सातवी पास आहे त्यावेळचं ते मॅट्रिक पास समजलं जायचं आणि नोकरीची offer ही आली होती),

हजरजबाबीपणा, माणसांना ओळखण्याचं कसब!प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतात पण तुझ्याबाबतीतले चढ-उतार बघता मला कायम प्रश्न पडतो

आणि कुतूहल वाटतं की कसं कसं निभावून नेतेस? आताही! प्रत्येक जन्म तुझ्या पोटी यावा हीच ईच्छा!" अशी पोस्ट करत हेमांगीने आईसाठी भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking : रोहित शर्माला वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हटवले! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नवा कॅप्टन; BCCI ने जाहीर केले संघ

Nashik Amardham : जुने नाशिक अमरधाममध्ये मोठी सोय; आता तिसरी विद्युत दाहिनी लवकरच कार्यान्वित होणार

AI In Office Work: घंटो का काम मिनिटों में! ऑफिसची कामं झटपट करण्यासाठी असं वापरा AI, वाढेल प्रॉडक्टविटी अन् क्वालिटी

Ramdas Kadam: चंद्रग्रहण रात्री दोन नग्न बाबा आणि बोकड, पत्नीवर आरोपांमुळे दुःख; कदमांचा भयंकर दावा

Sharad Purnima 2025: कोजागरी पौर्णिमेला करा 'हे' 7 उपाय, माता लक्ष्मीच्या कृपेने घरात कायम राहिल आर्थिक समृद्धी

SCROLL FOR NEXT