Ketki Chitale Sharad Pawar offensive post  Sakal
मनोरंजन

'माझीच बदनामी झाली, मला भरपाई द्या!' केतकी चितळे पुन्हा हायकोर्टात

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सोशल मीडियावर टीका करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली होती.

युगंधर ताजणे

Actress Ketki Chitale: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सोशल मीडियावर टीका करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली होती. पवारांवर वाईट शब्दांत टीका करणाऱ्या केतकीच्या त्या पोस्टनंतर (Social media post) राज्यभर तिच्याविरोधात आंदोलनं झाली होती. तिच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्या सगळ्या तक्रारींची नोंद घेऊन (entertainment news) एकत्रितपणे त्या गुन्ह्यांचा तपास पोलीसांनी सुरु केला. आता केतकी चितळेनं आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याविरोधात पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

केतकीनं यापूर्वी देखील हायकोर्टामध्ये धाव घेतली होती. आता एएनआयनं (Ketki Chitle facebook post) केलेल्या व्टिटमध्ये तिनं पुन्हा नव्यानं हायकोर्टामध्ये सुटकेसाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये पोलिसांनी केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. केतकीनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरुन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. केतकी ही तिच्या वादग्रस्त पोस्टसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. ती अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडियामुळेच जास्त चर्चेत असल्याचे दिसून आले आहे.

पहिल्यांदा जेव्हा तिला कोर्टासमोर हजर करण्यात आले त्यात तिनं आपण जे काही केले ते आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे म्हटले होते. त्यावरुन देखील तिच्या त्या वक्तव्यावर टीका करण्यात आली होती. केतकीनं जामीन मिळावा यासाठी कोर्टाकडे अर्ज केला होता. त्यानंतर आता तिनं पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टाकडे मला केलेली अटक ही बेकायदेशील असून आपल्याला जामीन मिळावा अशी विनंती कोर्टाला केली आहे. याशिवाय व्यक्तिस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती केतकीनं याचिकेद्वारे केली आहे.केतकीला 15 मे रोजी अटक करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT