Marathi Actress Kranti Redkar Photo Post Viral, Rainbow Marathi Movie Shoot Instagram
मनोरंजन

Kranti Redkar: विमानात विंडो सीट साठी क्रांती रेडकरनं घातली हुज्जत! चाहते म्हणाले...

क्रांती रेडकरनं स्वतः विमानातला एक फोटो पोस्ट करत चाहत्यांना एक आवाहन केलं आहे. ्र

प्रणाली मोरे

Kranti Redkar: क्रांती रेडकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. ती अनेकदा आपले व्हिडीओज,रील पोस्ट करत चाहत्यांचे लक्ष वेधून धेत असते. क्रांतीचे अनेक व्हिडीओ सामाजिक भान जपणारे असतात ज्याची चर्चा रंगते तर कधी काही मिश्किल विनोद करणारे असतात ज्यानं नेटकऱ्यांचे मनोरंजन होताना दिसते.

आता क्रांतीनं एक नवा फोटो पोस्ट केला आहे ज्यात तिच्या चेहऱ्यावर कुणाशी तरी भांडतानाचे हावभाव दिसत आहेत आणि ती एका विमानात आहे हे देखील स्पष्ट होत आहे. सुरुवातीला फोटो पाहून तरी पटकन भास होतोय की विमानात दुसऱ्या पॅसेंजरसोबत कदाचित क्रांती हुज्जत घालतेय कुठल्याशा गोष्टीवरनं. आता विमानात बरेचदा सीटवरनंच वाद रंगतात त्यामुळे क्रांतीचे देखील असेच काहीसे झाले असेल असा अंदाज आपण पटकन लावू. पण चला जाणून घेऊया या फोटोमागचं सत्य नेमकं काय आहे?(Marathi Actress Kranti Redkar Photo Post Viral, Rainbow Marathi Movie Shoot)

तर हा फोटो क्रांतीनं जो पोस्ट केलाय, तो आहे 'रेन्बो' या तिच्या आगामी मराठी सिनेमातला. विमानातला एक सीन शूट होतोय. आणि अर्थात क्रांती 'कॅप्टन ऑफ द शीप' असल्यानं दिग्दर्शकाच्या भूमिकेत शिरलेली दिसतेय. तिच्या चेहऱ्यावर भडकलेले भाव दिसतायत. आता खरी गम्मत पुढेच आहे.

क्रांतीनं सिनेमाच्या सेटवरचा हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,''माझ्या डीओपी वर मी रागावलेली नाही..तेव्हा मला या फोटोसाठी कॅप्शन सुचवा...'', मग काय क्रांतीनं असं म्हटल्यावर चाहत्यांना मोकळं मैदानच मिळालं...असे एक एक भन्नाट कॅप्शन चाहत्यांनी क्रांतीच्या फोटोला सुचवलेयत त्यानं हसून पुरती वाट लागेल. त्यातली लक्षवेधी एक कमेंट म्हणजे, 'विंडो सीटसाठी क्रांती भांडतेयस का...', किंवा दुसरी तर एक भन्नाटच आहे ज्यात एकानं लिहिलंय,'तुला सांगितलेलं बाहेर बस,आता सारखा टॉयलेटला जातोयस तर मला उठावं लागतंय...'

क्रांती रेडकर दिग्दर्शित करत असलेल्या 'रेन्बो' सिनेमात सोनाली कुलकर्णी, उर्मिला कोठारे,ऋषी सक्सेना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग युद्धपातळीवर सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; Infosys करणार शेअर बायबॅक! जाणून घ्या शेअर बाजारातील अपडेट्स!

ICC ODI Ranking मध्ये मोठा बदल! रोहित शर्माने गमावला अव्वल क्रमांक, 'या' खेळाडूने पटकावलं सिंहासन

Mumbai Local: मुंबई लोकलची सेवा कोलमडली! तांत्रिक बिघाडामुळे अनेक गाड्या खोळंबल्या, प्रवाशांना मनस्ताप

वयाची पन्नाशी गाठली; तरीही अविवाहित का आहे सुष्मिता सेन? स्वतः सांगितलेलं कारण, म्हणाली- माझ्या आयुष्यात...

Latest Marathi Breaking News Live Update : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT