kranti redkar, kranti redkar news, kranti redkar family SAKAL
मनोरंजन

अरे बापरे..! एकाच दिवशी Kranti Redkar ची झाली चार ऑपरेशन्स, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती..

या व्हिडिओत क्रांतीच्या कपाळावर बँडेजच्या पट्ट्या बांधलेल्या दिसत आहेत

Devendra Jadhav

Kranti Redkar News: अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या मनोरंजन विश्वात सक्रिय नसली तरीही तिच्या व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून ती फॅन्सच्या सतत संपर्कात असते. क्रांती रेडकर बद्दल एक धक्कादायक माहिती उघडकीस आलीय.

ती म्हणजे एकाच दिवशी क्रांतीची ४ ऑपरेशन्स झाली आहे. असं काय घडलंय कि एकाच दिवशी क्रांतीला ४ ऑपरेशन्स करावी लागली. तर बघूया

(marathi actress Kranti Redkar underwent four operations on the same day)

क्रांतीने एक व्हिडिओ शेयर केलाय. या व्हिडिओत क्रांतीच्या कपाळावर बँडेजच्या पट्ट्या बांधलेल्या दिसत आहेत. अनेकांना वाटलं कि क्रांतीला काही गंभीर आजार वैगरे झालाय का तर असं नाही. गैरसमज करून घेऊ नये.

क्रांती तिच्या मुलांसोबत खेळताना दिसत आहे. क्रांतीने झिया आणि झायदा हि जुळी मुलं आहेत. क्रांती अनेकदा त्यांच्यासोबतचे खास व्हिडिओ शेयर करत असते.

क्रांतीनं जो व्हिडिओ शेयर केलाय त्या व्हिडीओला तिनं 'ऑपरेशन डॉक्टर' असं कॅप्शन दिलं आहे. क्रांतीने गंभीर चेहरा करून हा व्हिडिओ शूट केलाय. तिच्या कपाळावर प्लॉस्टिकच्या चिकटपट्ट्या चिकटवल्या आहेत.

व्हिडीओमध्ये क्रांती म्हणतेय, "घरी डॉक्टर सेट आलेला आहे आणि सकाळपासून माझ्यावर 4 ऑपरेशन्स झाले आहेत. मायक्रोस्कोपनं पेशंटला पाणी पाजलं जात आहे. असं सगळं चालू आहे.

दोघींनी तब्येत बरी नव्हती. दोघींना बरं वाटावं म्हणून डॉक्टर सेट आणले आहेत". अशा पद्धतीने गमतीशीर अंदाजात क्रांती या व्हिडिओत बोलताना दिसते.

क्रांतीच्या या व्हिडिओवर तिच्या फॅन्सनी सुद्धा मजेशीर कमेंट केल्या आहेत. गृहिणी असणाऱ्या महिला ज्या मुलांना सांभाळतात त्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

"संध्याकाळपर्यंत काउंटरवर चार चॉकलेट्स दोन आईस्क्रीम आणि तीन लॉलीपॉप जमा करणे", "तरच पेशंटला हॉस्पिटल मधून सुट्टी. टाके सॉलीड घातलेत",

"Discharge बहुतेक chocolates मिळाल्याशिवाय तूला मिळणार नाही क्रांती" अशा कमेंट क्रांतीच्या फॅन्सनी या व्हिडिओला केल्यात

क्रांतीचे पती समीर वानखेडे यांनी आर्यन खानला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्या काळात क्रांती पती समीर वानखेडेंना कायम सपोर्ट करताना दिसली.

समीरच्या धर्मावर, त्यांच्या लग्नावर विविध आरोप प्रत्यारोप लावले गेले. पण क्रांती मात्र या संघर्षाच्या काळात समीरच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT