मनोरंजन

‘सावळे सुंदर रूप मनोहर’: अभिनेत्री निशिगंधा वाड 'फर्स्ट टाइम इन अल्बम'

आषाढी एकादशी (ashadhi ekadashi) जवळ आली की वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागते.

युगंधर ताजणे

आषाढी एकादशी (ashadhi ekadashi) जवळ आली की वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागते. वारकऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातील उत्कट भावना ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ (savया गाण्यातून उलगाडण्यात आल्या आहेत. या अप्रतिम गाण्याची निर्मिती सॉंग सिटी मराठी आणि शशिकांत वळतकर यांनी केली आहे. अजित पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या सुंदर अशा गाण्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड या गाण्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच एका अल्बम सॉंग मध्ये दिसणार आहेत. ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ या गाण्याची निर्मिती अभिनेते दीपक देऊळकर यांच्या संकल्पनेतून झाली आहे. (marathi actress nishigandha wad first time in album song savale sundar rup manohar yst88)

‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हे सॉंग सिटी मराठी आणि शशिकांत वळतकर यांची निर्मिती असलेले ह्रदयास्पर्शी गाणे ‘संगीत मराठी’ या वाहिनीवर आणि ‘सॉंग सिटी मराठी’ या यूट्यूब चॅनलवर रसिकांना बघायला मिळणार आहे. दिग्दर्शक अजित पाटील आणि त्यांच्या टीमने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे हे गाणे अतिशय कमी कालावधीत पूर्ण केले आहे. अभिनेते दीपक देऊळकर यांच्या संकल्पनेतून संगीतकार श्रीकृष्ण चंदात्रे यांनी ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हे गाणे संगीतबद्ध केले आहे, सोनाली चंदात्रे यांनी आपल्या सुमधुर आवाजात रसिकांना मंत्रमुग्ध करणारे गीत गायले आहे. या गाण्यांचे कालादिग्दर्शन वैभव शिरोळकर, छायांकन साईनाथ माने यांनी केले असून संकलन अमोल निंबाळकर यांनी केले आहे.

दिग्दर्शक अजित पाटील म्हणाले, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आम्ही ‘सावळे सुंदर रूप मनोहर’ हे गाणे मराठी माणसांच्या भेटीला आणत आहोत. या गाण्याच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी एका अल्बम सॉंग साठी काम केले आहे, त्यांच्या व्यस्त शेड्यूल मधून त्यांनी या गाण्यासाठी आम्हाला वेळ दिला, त्यांच्या सोबत काम करण्याचा अनुभव आम्हाला मार्गदर्शक ठरणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगळुरुतून जगभरात वाढवतायत 'ओळख मायबोलीची', देशविदेशातील हजारो विद्यार्थी शिकत आहेत मराठी

Rinku Singh Father Passed Away : क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

आजचे राशिभविष्य - 27 फेब्रुवारी 2026

Paneer Fried Rice Recipe: उरलेला भात फेकू नका! फक्त 15 मिनिटांत बनवा रेस्टॉरंट-स्टाइल पनीर फ्राइड राइस

Panchang 27 February 2026: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्राचे पठण आणि ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT