nivedita saraf, Nivedita Saraf news, nivedita saraf birthday celebration, ashok saraf SAKAL
मनोरंजन

Nivedita Saraf यांच्या ६० व्या वाढदिवसाचं दणक्यात सेलिब्रेशन, अशोक सराफ झाले रोमँटिक

निवेदिता ६० व्या वाढदिवस सेलिब्रेशनला प्रचंड खुश दिसत होत्या

Devendra Jadhav

Nivedita Saraf Birthday Celebration News: ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा ६० वा वाढदिवस नुकताच झाला.

त्यानिमित्ताने निवेदिता यांच्या वाढदिवसाचं दणक्यात सेलिब्रेशन झालं. निवेदिता यांच्या वाढदिवसाला अशोक सराफ रोमँटिक मूड मध्ये दिसले.

निवेदिता आणि अशोक सराफ यांनी खास लाल रंगाची थीम घातली होती. निवेदिता यांनी लाल रंगाचा गाऊन आणि अशोक सराफ यांनी लाल रंगाचा टी शर्ट परिधान केला होता.

(marathi actress nivedita saraf 60th birthday grand celebration, ashok saraf turn romantic)

याशिवाय निवेदिता यांच्या वाढदिवसाला त्यांची बहीण आणि कुटुंबीय उपस्थित होते. विशेष गोष्ट म्हणजे.. सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे सुद्धा वाढदिवसाला उपस्थित होते.

गेली अनेक वर्ष निवेदिता - अशोक - सुप्रिया - सचिन हे चौघे एकमेकांसोबत आहेत. एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला दोघेही उपस्थित असतात.

निवेदिता यांच्या वाढदिवसाला खास केक कापून सेलिब्रशन करण्यात आलं. याशिवाय सुप्रिया यांनी निवेदिताचा पापा घेत त्यांना केक भरवला. सचिन पिळगावकर यांनी केक कटिंगच्या वेळी निवेदिता यांना आशीर्वाद दिले.

यावेळी भिंतीवर ६० आकडा लिहिला होता. निवेदिता ६० व्या वाढदिवस सेलिब्रेशनला प्रचंड खुश दिसत होत्या.

जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिण उपस्थित राहिल्याने निवेदिता यांच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती.

'झी चित्र गौरव' पुरस्कार सोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. या सोहळ्यात अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला. त्यावेळी निवेदिता सराफ यांनी पोस्ट करून लिहिलं आहे की,

'मी झी मराठीची खूप ऋणी आहे अशोकला जीवनगौरव पुरस्कार देताना इतका अविस्मरणीय सोहळा केल्याबद्दल.. ' अशाप्रकारे निवेदिता सराफ यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.

निवेदिता सराफ सध्या मी, स्वरा आणि ते दोघे या नाटकात आणि भाग्य दिले तू मला या मालिकेत अभिनय करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT