POOJA 
मनोरंजन

HBD Pooja : चतुरस्त्र अभिनय आणि मनोवेधक नृत्यकला; आज पूजा सावंतचा बड्डे

सकाळवृत्तसेवा

मराठी चित्रपट सृष्टीत अनेक नव्या दमाचे कलाकार सध्या आपली कला सादर करत आहेत. सौंदर्याने आणि आपल्या खास अदाकारीने भूरळ पाडणाऱ्या अनेक अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत आहेत. मात्र, अभिनयातील आपल्या खास शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री तशा विरळाच! अभिनयाच्या या कलेच्या जोडीला जर नृत्यकलेची साथ असेल तर मग क्या बात! असा दुर्मिळ संयोग प्रेक्षकांच्या मन:पटलावर कायमचा घर करुन राहतो. आपल्या अशाच चतुरस्त्र अभिनयाने आणि मनोवेधक नृत्यकलेने मोहून टाकणाऱ्या पूजा सावंतचा आज वाढदिवस...  जाणून घेऊया कसा राहिलाय तिचा प्रवास... जाणून घेऊया कसा राहिलाय तिचा प्रवास...

अभिनेत्री पूजा सावंतने आपल्या अभिनयाने आणि नृत्यशैलीने प्रेक्षकांचे नेहमीच मन जिंकले आहे. आज पूजाचा वाढदिवस असून तिच्या फॅन्सनी सोशल मिडीयावर तिला भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत. 

हेही वाचा - 'काय म्हणावं या बाईला,सगळ्या अंगावर लिहिलं आय लव यु...'​
व्हायचं होतं प्राण्यांची डॉक्टर
पूजाचे बालपण मुंबईत गेले. बालमोहन विद्यालय या शाळेत तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयातून विज्ञान शाखेसाठी पूजाने प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असतानाच तिला नृत्य आणि अभिनयाची आवड निर्माण झाली. कॉलेजमधील अनेक स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला. पण अभिनयात तिला करियर करायचे नव्हते. पूजाला प्राण्यांचे डॉक्टर व्हायचे होते. प्राण्यांची सेवा करायची आवड तिला होती. 

अशी झाली पिक्चरमध्ये एंट्री
'मटा श्रावण क्वीन' या स्पर्धेमध्ये आईच्या हट्टामुळे तिने सहभाग घेतला व या स्पर्धेत ती विजेती झाली. या स्पर्धेतच तिला सचित पाटील या कलाकाराने पाहिले. तिचा अभिनय आणि नृत्य शैली पाहून 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटासाठी सचितने पूजाला ऑफर दिली. 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटामधून पूजाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. 

चित्रपट सृष्टीत पूजाची सुसाट घोडदौड
त्यानंतर 'एका पेक्षा एक', 'जल्लोष सुवर्ण युगाचा' यासारख्या शोमधून पूजा प्रेक्षकांच्या भेटीस आली. 2010 मध्ये 'तुम मिले' हा पूजाचा पहिला हिंदी चित्रपट होता. 'आता ग बया' या कॉमेडी चित्रपटात पूजाचा हटके अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळाला. तिच्या दगडी चाळ, झकास, बस स्टॉप, निळकंठ मास्तर, सतरंगी रे यासांरख्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 

मिळाला दादासाहेब फाळके पुरस्कार
'लपाछपी' या चित्रपटातील तिचा अभिनय कौतुकास पात्र ठरला. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल तिला 'दादा साहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारा'ने गौरवण्यात आले. दादासाहेब फाळके यांच्या 149 व्या पुण्यतिथी निम्मित 21 एप्रिल 2018 रोजी वांद्रे येथील सेंट ॲड्रयूज ऑडीटोरियम येथे तिचा हा गौरव करण्यात आला. सध्या, पूजा 'महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर' या शोचे परिक्षण करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident : कोल्हापुरात भीषण अपघात! डंपरच्या धडकेत महिला ठार; चार वर्षांचा मुलगा आईच्या प्रतीक्षेत, पतीचा आक्रोश

मनपा निवडणुकीबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर! राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यात? आचारसंहिता होणार लागू

Latest Marathi News Live Update: लातूरमधील औसा तालुक्यात कारला भीषण आग, चालकाचा होरपळून मृत्यू

Lionel Messi Mumbai Tour: सचिन तेंडुलकरसोबत भेट ते प्रदर्शनीय सामना... लिओनेल मेस्सीच्या मुंबई दौऱ्याचे अपडेट्स एका क्लिकवर

Tips For JEE Main Preparation: 12वी बोर्ड परीक्षेसोबत JEE Main ची तयारी कशी करावी? जाणून घ्या एक्सपर्टकडून

SCROLL FOR NEXT