priya bapat and umesh kamat
priya bapat and umesh kamat 
मनोरंजन

प्रिया-उमेशचा रोमँटिक अंदाज; 'जेव्हा आम्ही सोबत असतो..'

स्वाती वेमूल

तो शांत आणि ती अवखळ.. उमेश कामत-प्रिया बापटच्या जोडीसाठी हे विशेषण अत्यंत योग्य आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक प्रिया-उमेश आहेत. दोघंही दोन टोकाच्या स्वभावाचे असले तरी त्यांच्या जोडीकडे पाहून 'मेड फॉर इच अदर' असाच शब्द चाहत्यांच्या मनात येतो. त्यांचं प्रेम, त्यांचं लग्न, त्यांचं नातं हे सगळंच प्रेक्षकांचं कुतुहल वाढवणारं आहे. व्हॅलेंटाइन वीकमध्ये प्रियाने नुकताच उमेशसोबतचा एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. 

'जेव्हा आम्ही सोबत असतो, तेव्हा आमच्याकडे सर्वच काही असतं', अशा आशयाचं कॅप्शन प्रियाने या फोटोला दिलं आहे. प्रिया-उमेशच्या या मोनोक्रोम फोटोला ५० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेत्री अमृता खानविलकर यांनीसुद्धा त्यांच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. 

प्रिया-उमेशने सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला सुरुवातीला प्रियाच्या कुटुंबीयांकडून विरोध होता. उमेशचं अभिनय क्षेत्रातील काम हे त्यामागचं प्रमुख कारण होतं. या सहा वर्षांत उमेशचं करिअर, प्रियाचं शिक्षण आणि कुटुंबीयांना पटवण्याची दोघांची एकत्र लढाई असं सगळंच सुरू होतं. दोघांच्याही वयात जवळपास आठ वर्षांचं अंतर होतं. सुरुवातीला दोघांनाही इंडस्ट्रीतला जोडीदार नको होता. पण एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर दोघांचीही मतं बदलली. सगळ्यांच्या परवानगीने आणि आनंदाने दोघांचं लग्न पार पडलं. सोशल मीडियावर सक्रिय असणारे प्रिया आणि उमेश एकमेकांविषयीचं प्रेम खुलेपणाने व्यक्त करतात. या दोघांच्या जोडीला नेटकऱ्यांकडूनही भरपूर प्रेम मिळतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT