actress suhas joshi interview sakal
मनोरंजन

मी सासू असले तरी आईसारखीच वागते : ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी

झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' या मालिकेतील अनामिकाची आई म्हणजे अभिनेत्री सुहास जोशी यांची खास मुलाखत..

नीलेश अडसूळ

झी मराठी (zee marathi) वरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'तू तेव्हा तशी' (tu tevha tashi) ही मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. सौरभ आणि अनामिका सोबतच मालिकेतील एक सगळ्यात गोड व्यक्तिरेखा म्हणजे अनामिकाची आई. सुहास जोशी ही भूमिका अत्यंत चोख बजावत आहेत. त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील यशस्वी प्रवासाबद्दल साधलेला हा खास संवाद

१. तुमच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे, त्याबद्दल काय सांगाल?

- मी मालिकेत साकारत असलेली भूमिका ही खरंतर अनामिकाच्या सासूची आहे पण ती तिची सासू नसून आईच आहे. त्या दोघींचं नातं किंवा तिचं राधा म्हणजेच तिच्या नातीसोबत असलेलं नातं हे खूप गोड आहे. ती त्यांच्यासोबत मैत्रिणीसारखी वागते, त्यांच्या काळाप्रमाणे स्वतःला अपडेटेड ठेवते त्यामुळे ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना देखील त्यांच्यातली एक वाटतेय.

२. नाटक, चित्रपट की मालिका तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं माध्यम आवडतं?

- मला तिन्ही माध्यमं आवडतात. पण प्रेक्षकांची आवड वेगळी असू शकते. चित्रपट, मालिका बघून नाटकाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण चित्रपट आणि नाटक हे दोन्ही प्रकार वेगळे आहेत. प्रत्येक माध्यमाची विशिष्ट जमेची बाजू असते तसंच त्याला काही प्रमाणात मर्यादाही असतात.

३. कुठल्या माध्यमात काम करणं जास्त आव्हानात्मक आहे?

- नाटक ही खरी कला आहे. ते करताना तुमचा खरा कस लागतो. प्रचंड मेहनत लागते आणि आपण केलेल्या मेहनतीची दखल घेतली जात असेल तर त्याचा कलाकाराला आनंद होतोच.

४. तरुण पिढीला काय सल्ला द्याल?

- आता स्पर्धा वाढली आहे. बऱ्याचदा जे नाट्यक्षेत्राकडे वळतात त्यांना तग धरता येतोच असं नाही. काही वेळा नाट्यक्षेत्राकडे एक शिडी म्हणून बघितलं जातं. त्यांना खरं तर मालिका आणि चित्रपटांमध्ये काम हवं असतं. प्रामाणिकपणे नाटकाकडे वळणारे कलाकार आज फार कमी आहेत. तरीही नाट्यक्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाशिवाय वळू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Dhangekar: माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल; खलील शेख प्रकरणात मोठी कारवाई

Nagpur News : रामभक्तांना ‘हरामखोर’ म्हणणाऱ्यांना ‘रामरक्षा’ आठवली! निमंत्रणावरून संजय राऊतांवर संदीप जोशींचा घणाघात

वाहतूक पोलिसांना आता ‘सर्व्हिस गन’ बाळगणे अनिवार्य, विश्वास नांगरे पाटील यांचे थेट आदेश

BREAKING: रोहित शर्मा Lords वर निवृत्ती जाहीर करणार? IND vs ENG तिसरा वन डे सामना शेवटचा, धक्का देणारी Inside Story

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

SCROLL FOR NEXT