urmila nimbalkar share experience of her son athang while diwali shopping  Esakal
मनोरंजन

Urmila Nimbalkar: "अचानक एका बाईंनी अथर्वला मागुन पकडले आणि...", उर्मिलाने सांगितला सुन्न करणारा अनुभव

उर्मिला निंबाळकरने दिवाळीची खरेदी केल्यावर तिला आलेला विचित्र अनुभव सांगितलाय

Devendra Jadhav

Urmila Nimbalkar News:

मराठमोळी अभिनेत्री आणि जागतिक स्तरावर नाव कमावलेली प्रसिद्ध युट्यूबर म्हणजे उर्मिला निंबाळकर. उर्मिला सध्या अभिनय क्षेत्रात कार्यरत नसली तरीही तिने युट्यूबच्या माध्यमातुन भरपुर प्रसिद्धी मिळवली आहे.

उर्मिला सोशल मीडियावर तिचा मुलगा अथांग आणि नवरा सुकीर्त गुमास्तेचे अनेक फोटो - व्हिडीओ शेअर करत असते. उर्मिला तिचा मुलगा अथांगसोबतचे अनेक अनुभव सोशल मीडियावर शेअर करत असते.

उर्मिलाने नुकतंच इन्स्टाग्रामवर तिला आलेला विचित्र अनुभव शेअर केलाय. या अनुभवामुळे तिचा मुलगा अथांगला त्रास सहन करावा लागला. काय घडलं नेमकं? जाणुन घ्या

उर्मिला लिहीते, "एक कळकळीची विनंती आज संध्याकाळी मी, सुकीर्त आणि अथांग, रस्त्यावर आकाशकंदील खरेदी करताना, मागून अचानक एक बाई आल्या आणि त्यांनी अथांगला अचानक मागून पकडले आणि जोरात त्याचे गाल ओढले.

त्याने तो खुपच घाबरला आणि रडायला लागला. ही बाळांमधील या वयातील अतिशय नैसर्गिक प्रतिक्रिया आहे, त्याला 'Stranger Danger' असे वैज्ञानिक नावही आहे.

उर्मिला पुढे सांगते, "अथांगला व्हिडीओमधे पाहून त्याच्याविषयी प्रेमाची भावना असणे हे अगदी बरोबर आहे, पण २५ महिन्याच्या बाळाला त्याच्या इच्छेविरुद्ध ओढून त्याचे फोटो काढणे, तो रडत असतानाही त्याला ओढून स्वतःच्या जवळ खेचणे, बाहेरील अस्वच्छ हाताने बाळाला पकडणे, तो हात लावू देत नाही म्हणून पाठमोरे होऊन त्याला नावं ठेवत जाणे हे अयोग्य आहे. आणि अथांगसाठी असुरक्षितही. विचारल्यानंतर फोटोच काय तर घरी जेवायला सुद्धा येऊ आम्ही, परंतु आपल्या या अट्टाहासात बाळाचे हाल करणे मला पटत नाही."

गुगल इंडियाकडून उर्मिलाला मिळालं आमंत्रण

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचं सोशल मिडीयावर खुप फॅन फॉलोईंग आहे. उर्मिला एक प्रसिद्ध युट्यूबर आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलंच.

काहीच दिवसांपुर्वी मराठमोळ्या उर्मिलाने थेट 'गुगल'भरारी घेतली. गुगल इंडीयाकडून उर्मिलाला आमंत्रण मिळालं होतं. यावेळी भारतातल्या मानाच्या क्रिएटर्समध्ये उर्मिलाला स्थान मिळालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Solapur Rain Update: मुंबईत मुसळधार! ‘वंदे भारत’ रद्द, ‘सिद्धेश्वर’ मुंबईऐवजी पुण्यातून; रेल्वेगाड्या उशिरा सुटल्याने प्रवासी त्रस्त

रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट म्हणजे काय रे भाऊ? अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या...

Pune Rain Update : पुण्यात पावसाचा कहर; रस्त्यांवर पाणी, वाहतूक कोंडी

Kolhapur Newborn Death : पुराच्या पाण्याचा अडथळा, वाटेतच महिलेची प्रसुती; नवजात बालकाचा मृत्यू, कोल्हापुरातील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT