Sonalee Kulkarni Marathi Actress latest news esakal
मनोरंजन

Sonalee Kulkarni : 'बाराखडी गिरवताना कुठं माहिती होतं की…', ‘मराठी भाषा गौरव दिनी’ सोनाली काय म्हणाली?

मराठी भाषा गौरव दिनाच्या (Marathi Bhasha Gaurav Din 2024) निमित्तानं सोनालीनं शेयर केलेली पोस्ट चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

युगंधर ताजणे

Sonalee Kulkarni Marathi Bhasha Din Post : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या अंदाजासाठी चर्चेत राहणारी सेलिब्रेटी आहे. आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं (Sonalee kulkarni news) सोनालीनं केलेली पोस्ट चाहत्यांचे, नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सोनालीची ती पोस्ट व्हायरल होत आहे.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं अनेक मराठी सेलिब्रेटींनी पोस्ट (Marathi Bhasha Gaurav Din 2024) करुन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कित्येकांनी चाहत्यांशी संवाद साधला आहे. या सगळ्यात सोनाली कुलकर्णीची पोस्ट चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय ठरत आहे. नटरंग फेम सोनाली विषयी सांगायचं झाल्यास ती आता लवकरच दाक्षिणात्य चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनाली तिच्या पोस्ट अन् व्हिडिओमुळे चर्चेत (Sonalee Kulkarni Latest news) आली आहे. तिच्या इंस्टावरील पोस्टला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. सोनालीपूर्वी अभिनेता स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित, अभिजित केळकर यांनी देखील चाहत्यांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनालीनं तिचे साडीतील फोटो शेयर करत म्हटले आहे की, बाराखडी गिरवताना कुठं माहिती होतं की, पुढे हाती खजिना लागणारेय... तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....अशा शब्दांत सोनालीनं तिच्या भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सोनालच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाल्यास ती मलायकोट्टई वालीबान नावाच्या मल्याळम चित्रपटामध्ये झळकणार असून तिचा हा पहिलाच मल्याळम चित्रपट असणार आहे. यापूर्वी तिनं त्या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यांनी सोनालीच्या या प्रोजेक्टसला शुभेच्छा दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT