Marathi Bold Actress Priya Bapat Shared Cute Childhood photo with her father
Marathi Bold Actress Priya Bapat Shared Cute Childhood photo with her father 
मनोरंजन

लहानपणी होती निरागस, आता झाली 'बोल्ड'; पाहा कोण आहे मराठी अभिनेत्री?

सकाळवृत्तसेवा

सोशल मीडियावर लहानपणीचे फोटो टाकून कित्येक सेलिब्रिटी त्यांच्या फॅन्ससोबत बालपणीच्या आठवणी शेअर करतात. सोशल मिडीयामुळे सेलिब्रिटी आणि  चाहत्यांमध्ये आणखी जवळ आले आहेत. त्यामुळे सेलिब्रिटी आपल्या वैयक्तिक आयुष्य चाहत्यांबरोबर शेअर करतात. सध्या अश्याच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर आपल्या लहानपणीचा गोंडस फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. 

वेगवेगळ्या चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रिया बापट हिने नुकताच  तिच्या लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत प्रिया आणि तिचे वडिल दिसत आहेत. प्रियाने या फोटोमध्ये सुंदर फ्रॉक घातला आहे. तिच्या बाबांनी छोट्या प्रियाला कडेवर उचलून घेतले आहे. प्रिया या फोटोमध्ये खूप क्युट दिसत आहे. हा फोटोमधील लहान मुलगी प्रियाच आहे यावर अनेकांचा विश्वास बसला नाही. या फोटोला प्रियाने 'बाबा आणि मी' असं कॅप्शन दिले आहे. ही लहानपणीची प्रिया सर्वांना आवडली. चाहत्यांनी या फोटोला अनेक कमेंट केल्या आहेत. 

प्रिया बापटची हॅालिवूडमध्ये एन्ट्री
प्रिया सध्या 'फादर लाइक' या हॅालिवूड चित्रपटाचे शुटींग करत आहे. या चित्रपटासाठी प्रियाला ऑडिशनसाठी आठ सीन द्यावे लागले असे नुकतेच प्रियाने सांगितले. हा चित्रपट प्रियाचा पहिला हॅालिवूड चित्रपट असल्यामुळे या प्रोजेक्टसाठी प्रिया आणि तिचे चाहते खुप उत्सुक आहे. या आधी प्रिया टाईम पास, लोकमान्य 'एक युग पुरूष', 'काकस्पर्श', 'वजनदार', 'टाईम पास 2' या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT