मनोरंजन

वीणा आणि शिवचं ब्रेक-अप? सोशल मीडियावर चर्चा...

मराठी कलाविश्वातील आणि बिग बॉस मराठी २ फेम लोकप्रिय जोडी शिव ठाकरे आणि वीणा जगताप आता चांगलेच चर्चेत आले आहेत.

युगंधर ताजणे

मुंबई - मराठी कलाविश्वातील आणि बिग बॉस मराठी २ फेम लोकप्रिय जोडी शिव ठाकरे आणि वीणा जगताप आता चांगलेच चर्चेत आले आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी त्यांच नातं कबूल केलं होतं. पण,गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या ब्रेकपची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच वीणा आणि अभिनेञी अक्षया देवधर या दोघी लेह-लडाखला ट्रीपसाठी गेल्या होत्या.वीणाने शेअर केलेल्या अनेक पोस्टमध्ये तिने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओ मध्ये तिच्या हातावरील टॅटू दिसून आला. विशेष म्हणजे ज्या हातावर वीणाने शिवच्या नावाचा टॅटू काढला होता.परंतु, आता त्या टॅटूच्या जागी झाडाचं एक पान गोंदवण्यात आलं आहे.

त्यामुळे वीणा आणि शीवच्या नात्यात दुरावा आला का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, यावर वीणा आणि शीव कडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. वीणा हिने 'राधा प्रेम रंगी रंगली' , 'आई माझी काळुबाई', या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर, शीवने 'MTV Rodies' या हिंदी शो मध्ये SEMI-FINALIST आणि ' बिग बॉस मराठी २ 'चा विनर होता. सध्या त्याच 'शीलावती' हे गाणं रिलिज झालं आहे.

सोशल मीडियावर चर्चेत असणारी जोडी म्हणून वीणा आणि शिवचं नाव घेतलं जातं. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. वीणा आणि शिव हे सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. त्यामुळे त्यांचा फॅन फॉलोअर्सही मोठा आहे. ते सतत आपले वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसून येतात. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. काही रियॅलिटी शो मध्ये देखील ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना मिळालेला प्रतिसादही मोठा होता. आता त्यांच्या ब्रेक अपच्या चर्चेनं फॅन्सला धक्का बसला आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रेटीनं अशाप्रकारे ब्रेक अप करणं त्यांच्यासाठी धक्कादायक गोष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT