marathi celebrity Share Post About Maharashtra Politics viral Deputy Cm Ajit Pawar and Ncp vnp98  Esakal
मनोरंजन

Maharashtra Politics: राजकारण नव्हे तर मनोरंजन! राजकिय भूकंपानंतर कलाकारांच्या पोस्ट व्हायरल..

Vaishali Patil

रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात भयंकर मोठा स्फोट झाला. त्यातच राष्ट्रवादीत झालेल्या भुकंपाचे धक्के अख्या महाराष्ट्राला जाणवले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काल खरी भाकरी फिरवली. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी काल शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला.

इतकच नाही तर राजभवनात काल शपथविधीही पार पडला. अजित पवार यांनी काल उपमुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर 9 नेत्यांनीही शपथ घेतली. काल दुपारी अचानक झालेल्या या घडामोडींकडे पाहता एखाद्या सिनेमाच्या क्लायमॅक्सलाही लाजवेल असं काहीसं चित्र घडलं.

दरम्यान या प्रकरणानंतर अनेक राजकिय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्यात. त्यातच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय कलाकारांच्या प्रतिक्रियाही चर्चेत आल्या. त्यात सोनाली कुलकर्णी, शरद पोंक्षे, स्वप्नील जोशी, हेंमत ढोमे अशा अनेक कलाकारांनी पोस्ट शेयर केल्या आहेत.

महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर अभिनेता हेमंत ढोमे याने पोस्ट शेयर केली. तो आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो की, "खेळ तर आता सुरु झालाय…"

तर दुसरीकडे स्वप्नील जोशीनेही कोणत्याही राजकिय पक्षाचा उल्लेख न करता एक सुचक पोस्ट केली आहे. त्यात तो म्हणतो, "उत्तम पटकथा लिहिण्याची कला"

तर अचानक झालेल्या राजकिय घडामोडींवर प्रतिक्रिया देत सोनाली कुलकर्णीनेही इंस्टाला स्टोरी टाकली आहे, ती तिच्या स्टोरीत म्हणते की, 'पाऊस आणि भूकंप एकत्र? हे चाललंय तरी काय?'

तर दुसरीकडे "भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल !!!!" असं ट्वीट करत तेजस्विनी पंडितही चर्चेत आली होती. तर सुबोध भावे ने मी जरा एक दिवस मुंबईच्या बाहेर काय गेलो.....क्रमश: असं म्हणत चिमटा काढला आहे. आता कलाकरांच्या या ट्वीटवर आणि पोस्टवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Indian Railways Recruitment 2025: भारतीय रेल्वेत ज्युनियर इंजिनिअरच्या पदांसाठी भरती सुरू; येथे वाचा संपूर्ण माहिती

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

SCROLL FOR NEXT