Marathi cinema Picasso amazon prime announced world primer ott platforms 
मनोरंजन

मराठी सिनेमा; 'पिकासो'च्‍या वर्ल्‍ड प्रिमिअरची अमेझॉनकडून घोषणा

युगंधर ताजणे

मुंबई -  प्‍लॅटून वन फिल्‍म्‍स अॅण्‍ड एव्‍हरेस्‍ट एंटरटेन्‍मेंटच्‍या बॅनरअंतर्गत शिलादित्‍य बोराद्वारे निर्मित 'पिकासो'चे दिग्‍दर्शन व लेखन अभिजीत मोहन वारंग यांनी केले असून या चित्रपट राष्‍ट्रीय पुरस्‍कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक, तसेच समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकादम प्रमुख भूमिकेत आहेत. अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज त्‍यांचा पहिला मराठी चित्रपट 'पिकासो'चा ट्रेलर सादर केला असून या चित्रपटाचा विशेष वर्ल्‍ड प्रिमिअर 19 मार्च 2021 रोज अमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे.भारत आणि २४० देश व प्रदेशांमधील प्राइम सदस्‍य 19 मार्च 2021 पासून फक्‍त अमेझॉन प्राइम व्हिडिओवर मराठी नाट्य 'पिकासो'चा विशेष वर्ल्‍ड प्रिमिअर पाहू शकतात.

राष्ट्रीय पुरस्‍कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक (Prasad Oak), बालकलाकार समय संजीव तांबे (Samay Sanjeev Tambe) आणि अश्विनी मुकदाम  (AshwiniMukadam) अभिनीत चित्रपट 'पिकासो' अस्‍वस्‍थ मद्यपी वडिल व मुलाच्‍या नात्याची उत्तम कथा सादर करतानाच कोकणातल्या लोकजीवनाची आणि तिथल्या सुप्रसिद्ध अशा दशावतार कलेची झलक दाखवते. शिलादित्‍य बोराद्वारे (Shiladitya Bora) निर्मित 'पिकासो'चे दिग्‍दर्शन व सह-लेखन पदार्पणीय अभिजीत मोहन वारंग (Abhijeet Mohan Warang), तसेच सह-लेखक तुषार परांजपे (Tushar Paranjape) यांनी केले आहे.


 
चित्रपटाच्‍या कथानकाबाबत बोलताना पदार्पणीय दिग्‍दर्शक व सह-लेखक अभिजीत मोहन वारंग म्‍हणाले, ''मला बालपणापासूनच दशावतार कलेने भुरळ घातली आहे. मला दशावताराला अस्‍सल व मूळ स्‍वरूपात दाखवणारा पहिला चित्रपट 'पिकासो' सादर करताना आनंद होतो आहे. या चित्रपटात वास्तविकता आणण्याचा माझ्यासह प्रत्येक कलाकाराचा पयत्न होता आणि त्यासाठी आम्ही वास्‍तविक ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. लोककथेनुसार लोककलेचा उगम तळकोकणाच्‍या वालावल शहरामधील लक्ष्‍मी-नारायण मंदिरामधून झाला आहे, तिथे आम्‍ही चित्रपटाचे शूटिंग केले. या चित्रपटासोबतच आम्ही कलाकाराच्‍या जीवनातील दैनंदिन आव्‍हानांना लोकांसमोर आणण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. 

प्‍लॅटून वन फिल्‍म्‍सचे निर्माता शिलादित्‍य बोरा म्‍हणाले, ''मराठी चित्रपटसृष्‍टी ही भारतातील सर्वात प्रगतीशील चित्रपटसृष्‍टी असून तिने अलिकडील दशकामध्‍ये अनेक उल्‍लेखनीय चित्रपटांची निर्मिती केली आहे, याबाबत काहीच शंका नाही. यापैकी अनेक चित्रपटांची आंतरराष्‍ट्रीय समीक्षकांनी प्रशंसा केली आहे आणि भारतातील बॉक्‍स ऑफिस विक्रम मोडून काढले आहेत. 'पिकासो' हा असाच एक चित्रपट आहे, जो सर्व वयोगतील व सीमांपलीकडील प्रेक्षकांना प्रेरित करेल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT