raj thakarey 
मनोरंजन

'..ते सुख सापडेल असं वाटतं' म्हणत केदार शिंदेंच्या नव्या मालिकेसाठी राज ठाकरेंनी दाखवली उत्सुकता

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला.  'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेतून अभिनेता भरत जाधव छोट्या पडद्यावर दिसून येणार आहे. केदार शिंदे आणि भरत जाधव ही जोडी नेहमीच कमाल करताना दिसून आली आहे. त्यामुळे ब-याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर या दोघांची जादू पाहायला सगळेच उत्सुक आहेत. या मालिकेच्या प्रोमोने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्सुकता देखील वाढवली आहे. मराठी कलाकारांच्या पाठिशी राज ठाकरे अनेकदा खंबीरपणे उभे राहताना दिसले आहेत. नुकतीच त्यांनी या नव्या मालिकेबद्दल उत्सुकता दाखवत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.  

राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे, 'कोरोनाचं सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट ह्यामुळे सगळ्यांचा आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या 'सुखी माणसाचा सदरा' ह्या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दूरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडेल किंवा सापडू दे असं मनापासून वाटतं.'

इतकंच नाही तर राज ठाकरे पुढे म्हणाले, 'भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी पुन्हा छोट्या पडद्यावर आलेलं पाहून छान वाटलं. ह्या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा 'सुखी माणसाचा सदरा' रोज किमान अर्धा तास तरी मराठी मनांना ह्या अनिश्चिततेतुन ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल.'

कलाकारांच्या उत्तम अभिनय कौशल्याचं त्यांच्या कलेचं राज ठाकरे आवर्जुन कौतुक करत असतात. काही दिवसांपूर्वीच निलेश साबळेला फोन करुन 'माझी मिमिक्री चांगली करतोस' असं म्हणत कौतुकाची थाप दिली होती.   

marathi director kedar shinde new serial sukhi mansacha sadara mns chief raj thackeray open up  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT