ravi jadhav
ravi jadhav Esakal team
मनोरंजन

टाईमपास-३ मधील 'त्या' दृष्याबद्दल दिग्दर्शकांनी पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सध्या मराठी चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे, या चित्रपटानंतर अभिनेत्री हृता दुर्गुळे, प्रथमेश परब आणि दिग्दर्शक रवी जाधव यांचे सर्वांनीं भरभरून कौतुक केले जात आहे, यादरम्यान मराठी एकीकरण समितीकडून या चित्रपटात दाखवलेल्या राष्ट्रभाषेसंबंधी माहितीवर आक्षेप घेण्यात आला आहे.

या चित्रपटातील दृष्यात हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचे दाखवण्यात आल्याचे दृष्य काढून टाकण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यासंबंधीच्या मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये टाईमपास ३ चे दिग्दर्शक रवी जाधव यांना तुमच्या चित्रपटाच हिंदी राष्ट्रभाषा अशी खोटी माहिती दाखवली आहे, असा अक्षेप घेण्यात आला आहे. पुढे या पोस्टमध्ये राष्ट्रभाषा असण्याचे पुरावे द्या, अन्यथा माफी मागा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. तसेच अफवा पसरवणे गुन्हा असून तो आपण करत आहात चित्रपटातील ते दृश्य तातडीने काढून टाकावे. आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल ही अपेक्षा, असे अवाहन देखील करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhanparishad Election : शिवसेना ठाकरे गटाकडून परब, अभ्यंकर

NASA : भारतीय अंतराळवीरांना आता ‘नासा’चे धडे; गार्सेटी यांची घोषणा

Loksabha Election 2024 : लोकांनी द्वेषाला धुडकावले; राहुल गांधी यांचे प्रतिपादन

Loksabha Election 2024 : ‘साखरेचा वाडगा’ काँग्रेससाठी कडू! देवरियात ओबीसी मतांवर भाजपची भिस्त

Narendra Modi : मतपेढीसाठी ‘इंडिया’चा मुजरा; मोदींची विरोधकांवर टीका

SCROLL FOR NEXT