mulgi zali ho serial  file image
मनोरंजन

'मुलगी झाली हो'च्या निर्मात्यांना महिला आयोगाचा दणका

मराठी मनोरंजन विश्वामध्ये (Marathi Entertainment News) सध्या मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. काही

सकाळ डिजिटल टीम

मराठी मनोरंजन विश्वामध्ये (Marathi Entertainment News) सध्या मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून मुलगी झाली हो (Mulgi zali Ho) या मालिकेतील कलाकार वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्टमधून (Social Media News) चर्चेत आले आहेत. त्यापैकी किरण माने (Actor Kiran Mane) यांनी आपल्याला सोशल मीडियावर राजकीय लेखन केल्याप्रकरणी मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप केला होता. यासगळ्या प्रकरणात माने यांच्या पत्नी ललिता माने यांनी संबंधित मालिकेच्या निर्मात्यांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावरुन आता महिला आयोगानं मुलगी झाली हो मालिकेच्या निर्मात्यांना दणका दिला आहे.

आयोगानं प्रॉडक्शन हाऊसला आपला लेखी खुलासा तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहे. यावरुन हे प्रकरण आता पुन्हा एका नव्या वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे स्वाक्षरी असलेले हे पत्र मुलगी झाली हो मालिकेच्या निर्मात्यांना पाठविण्यात आले आहे. या मालिकेच्या निर्मात्या सुझाना घई पॅनोरामा इंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांना गेल्या काही दिवसांमध्ये जो काही प्रकार घडला त्याबाबत लेखी खुलासा आयोगानं सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अर्जात म्हटल्याप्रमाणे अर्जदार यांचे पती किरण माने हे आपल्याकडून निर्मित 'मुलगी झाली हो' या मालिकेत गेल्या ९ वर्षापासून अभिनय करत आहेत व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. अर्जदार यांचे पती अभिनेते, पुरोगामी विचारवंत व लेखकही आहेत. ते विविध माध्यमातून त्यांची वैचारिक भूमिका लिहित मांडत असतात त्यामुळेच त्यांना कोणतीही पूर्व संधी वा सूचना न देता निर्मात्यांनी मालिकेतून काढून टाकले आहे.

निर्मात्यांच्या या कृतीमुळे एका प्रगल्भ अभिनेत्यावर अन्याय झाला आहे. त्याचबरोबर कुटुंब आर्थिक संकटात सापडून मानसिक तणावात आहे. असे अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रार अर्जात नमूद केले आहे. कलावंतांनी वैचारिक राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणारी आहे. तरी याबाबत आपण आपला लेखी खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२(२) व १२(३) नुसार तात्काळ सादर करावा. असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check : भारतीय संघ 'लूझर'..! IND vs PAK हस्तांदोलन प्रकरणावर रिकी पाँटिंगचं विधान Viral; पण हे खरंय का?

MP Nilesh Lanke: अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या : खासदार नीलेश लंके; 'चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार'

Siddharth Shinde Death: Supreme Court मध्ये चक्कर आली आणि... सिद्धार्थ शिंदेंवर काळाचा घाला | Sakal News

Latest Marathi News Updates : जालन्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे कपाशी पीक गेलं पाण्याखाली

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

SCROLL FOR NEXT