Kedar Shinde wife facebook
मनोरंजन

केदार शिंदे पुन्हा चढला बोहल्यावर; पाहा लग्नसोहळ्याचे फोटो

आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांनी केलं कन्यादान

सकाळ डिजिटल टीम

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेच्या Kedar Shinde चित्रपटांचे अनेक चाहते आहेत. केदार नुकताच दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. Kedar Shinde wedding या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्यांनी या विवाहसोहळ्याचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा लग्न सोहळा ९ मे रोजी पार पडला. हा समारंभ अगदी साग्रसंगीत पद्धतीने पार पडला. या सोहळ्याला अंकुश चौधरी, शर्मन जोशी, भरत जाधव, सिध्दार्थ जाधव, आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या प्रसिद्ध कलाकारांनी उपस्थिती लावली. (marathi film director Kedar Shinde got married again on his wedding anniversary)

केदारने लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त पत्नी बेलासोबत पुन्हा लग्न केलं. बेला आणि केदारच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नसमारंभाला सर्व मराठी आणि हिंदी कलाकारांनी व्हिडीओ कॉलद्वारे उपस्थिती लावली. व्हिडीओ कॉलवर शर्मन जोशीने केदारला सांगितले, 'यार केदार आम्ही एक वेळा लग्न करून पश्चात्ताप करतोय आणि तू पुन्हा हे धाडस कसं केलंस?'. तर सिद्धार्थ जाधव म्हणाला, 'सर मी तुमच्या लग्नात नाचणार आहे.' सिद्धार्थने खरोखरच व्हिडीओ कॉलवर सर्वांना डान्स करून दाखवला. या सर्व विवाहसोहळ्याचे वर्णन वसुंधरा साबळे यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये केले आहे.

हेही वाचा : सलमानचा बॉडीगार्ड 'शेरा'ला मिळतो इतका पगार

बेला शिंदे आणि केदार शिंदे यांनी पळून लग्न केल्याने त्यांच्या पहिल्या लग्नामध्ये कन्यादानाचा विधी पार पडला नव्हता आणि या लग्नात लॉकडाउनमुळे बेलाचे आई वडिल येऊ शकले नव्हते. त्यामुळे या अनोख्या लग्न सोहळ्यामध्ये कन्यादान सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर यांनी केले.

लग्नाबद्दल केदार शिंदेच्या मुलीची पोस्ट

'आई-बाबांचा कधी साखरपुडा झाला नव्हता, हळदीचा कार्यक्रम पार पडला नव्हता, एकत्र राहण्यासाठीची वचनं घेण्यासाठी त्यांनी मुहूर्त पाहिला नव्हता. त्यामुळे त्यांच्या २५व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना ही खास भेट देण्याचं ठरवलं. लग्नसोहळा नाही तर लग्न महत्त्वाचं असतं हे पटवून देण्यासाठी आई-बाबा तुमचे आभार', अशी पोस्ट केदार शिंदेंची मुलगी सना हिने लिहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT